चंद्रपूर - बल्लारशाह महामार्गावर बाबुपेठ येथे दोन्हीं बाजूनी काँक्रिट नाली देणेबाबत आम आदमी पार्टी चे बांधकम अधीक्षकांना निवेदन

चंद्रपूर - बल्लारशाह महामार्गावर बाबुपेठ येथे दोन्हीं बाजूनी  काँक्रिट नाली देणेबाबत आम आदमी पार्टी चे बांधकम अधीक्षकांना निवेदन


चंद्रपूर : चंद्रपूर - बल्लारशाह महामार्गावर दोन्हीं बाजूनी बाबुपेठ येथे काँक्रिट नाली नसल्याने रोड चे पाणी नागरिकांच्या घरात शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान होत असल्याची तक्रार आम आदमी चे शहर सचिव राजू कुडे यांच्या कडे प्राप्त झाल्याने आम आदमी पार्टीचा शिष्टमंडळव्दारे पाहणी केली असता, रोड मुळे लोकांचें घरे खाली गेल्याने रोड वरील पाणी खालील भागात नागरीकांचा घरात शिरत असल्याचे आढळून आले. 
ज्या अर्थी एखादा महामार्ग लोकवस्थितून जात असताना तिथे नाली देणे अपेक्षित असते परंतू बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे तिथे नाली न झाल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ नालीचे नियोजन करून जनतेची समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे देण्यात आला.
 यावेळेस आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजू कुडे, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे,  शहर उपाध्यक्ष सुनील सद्दभयाजी, सिकंदर सागोरे, शहर सह सचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्निल घागरगुंडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, दिपक बारशेट्टीवार, सुजित चेडगुलवार, नामदेव हनवंते इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]