पोंभुर्णा नगर पंचायत इमारतीला गेले तळे

 पोंभुर्णा नगर पंचायत  इमारतीला गेले तळे

पोंभुर्णा - चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील नगर पालिकांना लाजवेल अशी देखणी इमारत तब्बल 9 कोटी 99 लक्ष रुपये खर्च करून बांधलेल्या मंत्रालयानंतरची सुसज्ज इमारत ‘व्हाईट हाऊस’ (White House Pombhurna)  या नावाने लौकिक असलेल्या पोंभूर्णा नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहाचे छत आच्छादन दि. 21 जुलै शुक्रवारी झालेल्या सायंकाळी संततधार पाऊस, वादळी वाऱ्यामुळे कोसळले. त्यामुळे नगर पंचायत कार्यालयाच्या इमारतीचे वादळ, वारा, पाऊस, अतिउष्णता, हवा आदींवर आधारित पर्यावरणपूरक बांधकामाबाबतचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. छत कोसळून नगर पंचायतच्या इमारतीत झालेला बोगस काम चव्हाट्यावर आला आहे.

सर्व सोयींनी सुसज्ज व भव्यदिव्य अशी इमारत ‘व्हाईट हाऊस’ या नूतन इमारतीचे लोकार्पण 2019 मध्ये वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister and Guardian Minister Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुख्य बसस्थानक चौकामध्ये असलेल्या आणि सर्व सोयीनिशी अदयावत असलेल्या ह्या इमारतीसाठी तब्बल 9 कोटी 99 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आली होती.

शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहाचे छप्पर कोसळल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे नगर पंचायत कार्यालयातील छताचे पीओपी आच्छादन कोसळले. त्याचा फटका कार्यालयीन कामकाजावर पडला आहे. आच्छादन कोसळले त्यावेळी त्या सभागृहात कुणीच नसल्याने सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.नगर पंचायत कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या बांधकामाची कार्यान्वयीन यंत्रणा ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने सदर काम (पीडब्ल्यूडी) ने केलेला होता. अत्यंत घाईघाईने व भव्यदिव्य इमारत म्हणून नावलौकिक मिरवत बांधण्यात आलेली इमारत निकृष्ट दर्जाची व गुणवत्तापूर्ण नसल्यानेच सदर इमारतीचे छत कोसळले आहे. एवढेच नव्हे तर इमारतीची छत हि गळायला लागली असल्याने व्हाईट हाऊसचे पितळ अल्पवेळातच उघडे पडले आहे.काही महिन्यापूर्वी एक नागरिक पायऱ्या उतरताना एंगल तुटल्याने कोहळला व जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीव या निमित्ताने धोक्यात आले असून संबंधित इमारत बांधकाम केलेली यंत्रणा व कंत्राटदाराने बोगस काम केल्यानेच हा प्रकार घडलेला आहे.याबाबत नगरपंचायत प्रशासनाने एवढा गंभीर प्रकार घडूनही पीडब्ल्यूडी विभागाला न खडसवने याबाबत अनेक शंका निर्माण करीत आहेत. संबंधीत इमारतीच्या छत कोसळलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी केली आहे.

“व्हाईट हाऊसचे छत कोसळणे हे भ्रष्ट्राचार झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व गुणवत्तापूर्ण झाले नसल्याने सदर कामाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी”
आशिष कावटवार,
विरोधी पक्षनेते, नगरपंचायत पोंभूर्णा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]