पळसगाव (खुर्द) येथे अकरा वर्षाच्या मुलीवर नराधमाचा बलात्कार, आरोपीस अटक


यश कायरकर

तळोधी (बा) : - नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव खुर्द येथे आज माणुसकीला काडीमा फासणारी घटना उघडकीस आली. एका अकरा वर्षाच्या मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. सविस्तर वृत्त याप्रमाणे की,  शेतीचा सीजन असल्यामुळे मुलीच्या घरचे शेतावर काम करायला गेले असताना , लहान भाऊ घरी झोपले असताना मुलीला एकटीच घरात बघुन  शेजारी राहणारा आरोपी मनोहर नथ्थु चावरे वय 54 वर्ष याने सकाळी 8 वाजता आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून बळजबरीने त्या चीमुकलीवर बलात्कार केला.  शेतावरून आई परत आल्यानंतर मुलीने आपली आपबीती सांगतास आईने नागभीड पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब कुठलीही वेळ न गमवता नागभीड पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपीस तात्काळ अटक केली.  यावेळी आरोपीच्या विरुद्ध 376 AB,  376 /2 N,  354 A, 450 भांदवी सह कलम 468 पोक्सो,  दाखल करण्यात आले. नागभीड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. वैभव कोरवते यांचे मार्गदर्शनात समोरील तपास पी.एस.आय. आकाश कुमार साखरे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]