शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ग्यानीवंत गेडाम यांची निवड...


 
चेतना माध्यमिक विद्यालय मजरा(रै )पालक सभा संपन्न...वरोरा.....जगदीश पेंदाम

तालुक्यातील चेतना माध्यमिक विद्यालय मजरा (रै )येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विद्यार्थ्यांचा विविध प्रश्नाबाबत, शालेय गणवेश, शिस्त, दर्जेदार शिक्षण, शालेय पोषण आहार इत्यादी विषयांवर  सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांच्या तथा विद्यार्थ्यांच्या विविध समस्या वर तोडगा काढण्यात आला.
 सभेच्या शेवटी वर्षं २०२३-२४ शालेय सत्रा करिता विविध कार्यकारीण्या गठीत करण्यात आली यावेळी सालोरी-येन्सा ब्लॅक मजरा (लहान) येथील सामाजिक कार्यकर्ते ग्यानीवंत गेडाम यांची शाळा व्यवस्थापन समिती, चेतना माध्यमिक विद्यालय मजरा (रै) च्या अध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राजेश चव्हाण व शाळेचे मुख्याध्यापक अरविंद ढवस यांची सचिव पदी निवड करण्यात आली सोबतच शिक्षक पालक संघ व शिक्षिका माता संघ यांची कार्यकारणी सुद्धा घोषित करण्यात आली. शिक्षक पालक संघाचे अध्यक्षपदी अरविंद ढवस मुख्याध्यापक, उपाध्यक्ष प्रवीण बोढे, सचिव नीलिमा ढवस, सहसचिव सुरेश मेश्राम, पालक प्रतिनिधी सुभाष लढोदिया यांची निवड करण्यात आली.
शिक्षिका माता पालक संघ अध्यक्षपदी अरविंद ढवस मुख्याध्यापक, उपाध्यक्ष ललिता कन्नाके, सचिव अनिता कोडापे, सहसचिव जोशना सिडाम, पालक प्रतिनिधी मंजुषा पुसनाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सभेची प्रस्ताविक देशकर मॅडम, तर आभार प्रदर्शन ढवस मॅडम यांनी केले. यावेळी बहुसंख्येने पालक वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]