काँग्रेसचे नेते राकेश रत्नावार यांच्या सहकार्याने चिमुकलीला जीवनदान
27-07-23 ला ग्रामीण रुग्णालय मुल येथे रात्रौ 10 वाजता 6 दिवसाच्या मुलीची प्रकुर्ती अत्यंत चिंताजनक असल्याने वेळेवर चंद्रपूर ला दवाखाण्यात नेण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने वातावरण तापलेले होते. उपजिल्हा रुग्णालयमधे डॉक्टर बरेच केस मध्ये रेफर हे रात्रीच्या वेळेला देत असतात. याने तालुक्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते. परंतु राकेशभाऊ रत्नावार यांनी वरिष्ठांनसी चर्चा करून तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून चंद्रपूरला रवाना करून दिले. उपजिल्हा रुग्णालया मूल येथे अशा केस नेहमी होत असतात याचा तालुक्यातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. डॉक्टर नर्सेस सुद्धा वेळेवर उपलब्ध नसतात ट्रेनिंग वाल्या नर्स प्राथमिक इलाज करतात डॉ. फोन उचलत नाही आणि दवाखान्यात वेळेवर उपलब्ध सुद्धा नसतात असं रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. मुलमध्ये इमर्जन्सी साठी चांगले खाजगी रुग्णालय नसल्याने तालुक्यातील सर्व रुग्ण प्राथमिक इलाज करिता उपजिल्हा रुग्णालयात येत असतात. डॉक्टर फोन उचलत नाही ? नर्स स्टॉप सुद्धा उद्धट बोलतो ? प्रत्येक रुग्ण कोणाला तरी फोन करून का नेहमीच बोलावेल ? रुग्णांचे जीव गेल्यावर डॉक्टरांना जाग येईल का ? असे नानाविध प्रश्न रुग्णांची नातेवाईक नेहमीच करत असतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]