सावरगाव हद्दीत बार सुरू करण्यास परवानगी देऊ नये. जिल्हाधिकारी व अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर, यांना ग्रामपंचायतचे निवेदन.यश कायरकर, (तालुका प्रतिनिधी);
         सावरगाव हद्दीतील गावालगत असलेल्या पेट्रोल पंप जवळ असलेल्या सौ.सोनू नूतन कटारे यांच्या मालकीच्या भु.क्र. ४१५ या ०.७४ आर.जी. ३० आर. ही जागा कृषक जागा अकृषक करण्या करीता व या जागेवर त्यांनी फ्रेंड्स हॉटेल अँड रेस्टॉरंट खोलण्याकरिता सावरगाव ग्रामपंचायतकडे परवानगी मागितली होती व बांधकाम सुरू केला मात्र त्यांच्या मनामध्ये त्या जागेवर बियर बार स्थापन करण्याचा मानस असल्याचे ने त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बियर बार उघडण्याचा मानस आखला व त्याबद्दल ग्रामपंचायतला कोणतीही पूर्व सूचना दिलेली नव्हती. मात्र ग्रामपंचायत सदस्यांना व गावातील लोकांना याबाबतीत माहिती मिळतात गावातून या  सुरू होऊ घातलेल्या बार करीता विरोधाचा सुरू उठू लागला. व तसे ग्रामस्थां द्वारे ग्रामपंचायतला कळविण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतचे सरपंच श्री रवींद्र पा. निकुरे यांनी तात्काळ याबाबतीत विचार विनिमय करून जिल्हाधिकारी व संजय पाटील, अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर, यांना स्वतः जाऊन ग्रामपंचायत द्वारे त्या हॉटेल आणि रेस्टॉरंट करता परवानगी मागलेल्या ठराविक जागेवर  बार ला परवानगी देण्यात येऊ नये व त्या ठिकाणी तर काय सावरगाव हद्दीत कुठेही बारला परवानगी देण्यात येऊ नये करिता निवेदन दिले.
          गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार जर जिल्हाधिकाऱ्याने व संजय पाटील अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर यांनी ग्रामपंचायतच्या या विरोधाला केराची टोपली दाखवत सावरगाव हद्दीत बार उघडण्याचा परवाना दिला तर,  सावरगावातील काही महिलांच्या वतीने बळजबरीने दारू भट्टी सुरू करून आणि बार सुरू  करण्यात येईल असा शासनाला इशारा देत  गावातील महिलांनी एकजुटीने या होणाऱ्या बारच्या विरोधात आवाज उठवला आहे.  व जर यातही  जिल्हाधिकारी व संजय पाटील अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर यांनी परवानगी दिलीच आणि जर सौ. सोनू नितीन कटारे यांनी बार उघडला तर मोठ्या प्रमाणात गावातील संपूर्ण महिला एकत्र येऊन त्याला विरोध करून मोठा आंदोलन उभारला जाईल. असेही गावातील महिलांनी आपल्या परिवाराला व गावातील युवकांच्या पिढीला बरबाद होण्यापासून वाचवण्याकरिता आक्रोशाचा पवित्रा घेतलेला आहे. 
           तरी आता गावातील ग्रामपंचायतने जिल्हाधिकाऱ्याना व संजय पाटील अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर, हे बारच्या विरोधात दिलेल्या निवेदनाकडे जिल्हाधिकारी व संजय पाटील अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर हे कोणत्या नजरेने पाहतात याकडे गाववाशियांचे लक्ष लागलेले आहे.
           "सौ. सोनू कटारे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर फक्त हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी ग्रामपंचायतला मागितली होती. मात्र त्यामागे त्यांचा जर  बिअर बार उघडण्याचा मानस होता तर तसे त्यांनी आम्हाला कळविले नव्हते . या बाबतीत  माहिती होताच आम्ही जिल्हाधिकारी, व संजय पाटील अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर, यांच्याकडे संपूर्ण सावरगाव परिसरात कुठेही या बार ला परवानगी देण्यात येऊ नये म्हणून निवेदन सोपविला आहे. जर तरीही त्यांना परवानगी मिळून त्यांनी बार सुरू करन्याचा प्रयत्न केला तर ग्राम पंचायत द्वारे विरोध केला जाईल. ग्राम पंचायत ही ग्रामसभेपेक्षा मोठी नाही त्यामुळे ग्रामसभा जे ठरवेल त्यानुसार आम्हाला त्यांच्या विरोधात कारवाई करावी लागेल." - रवींद्र पा. निकुरे, सरपंच ग्रा.पं. सावरगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]