सुनिल तटकरे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

 सुनिल तटकरे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष 

अजित पवार गटाकडून नवी खेळीराज्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ncp अध्यक्ष जयंत पाटील यांना हटवून त्यांचे जागेवर सुनिल तटकरे sunil tatkare  यांची निवड करण्यात येत असल्यांचे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले.  ते आज मुंबई येथे सहयांद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.  उपमुख्यमंत्री अजीत पवार ajit pawar हे यावेळी उपस्थित होते.

काल, राष्ट्रवादीचा एक गट अजीत पवार यांचे नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.  यानंतर राज्यात राजकीय गदारोळ झाला.  पक्ष आणि चिन्ह घेवून आपण सरकारमध्ये सहभागी झालो असे अजीत पवार यांनी सांगीतले होते, मात्र दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी वेगळीच भुमिका घेतली होती.  आज ट्विटरद्वारे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सरचिटनिस सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालट्टी शरद पवार यांनी केल्यानंतर, काही क्षणातच, पटेल यांनी पत्रकार परिषद घेत, जयंत पाटील यांनाच पदावरून काढल्यांचे जाहीर केले.  दोनही गटाच्या एकमेकाचे विरोधातील भुमिकांमुळे भविष्यात संघटनेवर ताबा कुणाचा? यावर वाद होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]