वाघाच्या हमल्यात आकापुर येथील महीला ठार.(तळोधी बाळापुर वन परिक्षेत्रातील तीन दिवसांत दुसरी घटना.)
यश कायरकर, (तालुका प्रतिनिधी);
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येत असलेल्या तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेठी नियत क्षेत्रातील,उश्राळा मेंढा रीट, परिसर गट क्रमांक 2,  संरक्षित वन क्षेत्र परिसरात , शेतावर काम करायला गेलेली आकापुर येथील  श्रीमती देवता जीवन चनफने वय 42 वर्ष, ही महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली.
   शेत परिसरामध्ये काम करत असताना आज सायंकाळी ५ वाजता चे दरम्यान परिसरात वावरणाऱ्या  वाघाने हमला करून  ठार केल्याची घटना घडली. मात्र घटनेनंतर महिलेला उचलून वाघाने झुडपी जंगलात नेल्यामुळे शोध घेतला असता मृतदेह रात्र ९:३० वाजता आढळून आला,
         यावेळी घटनास्थळी तळोधी बाळापुर चे अतिरिक्त कार्यभार असलेले  वन परिक्षेत्र अधिकारी श्री विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात तळोधी चे क्षेत्र सहाय्यक वाळके, गंगासागर हेटी चे वनरक्षक एस.एस. कुळमेथे , तळोधी बा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री मंगेश भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोवर्धन, यांच्या उपस्थितीत  मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता नागभिड येथे रवाना केले.
           मृतकाचे पती हे सुद्धा काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्यानं या घटनेनंतर मुलांवर संकट कोसळेल आहे. यावेळी तात्काळ मदत म्हणून मृतकाच्या परिवाराला 25,000 (पंचवीस हजार) रुपये ची मदत करण्यात आली. व लवकरात लवकर उर्वरित 19 लाख 75 हजार ही मदत सुद्धा परिवाराला करण्यात येणार आहे .
           तरी या परिसरात वाघाचे वास्तव असल्याने शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. असे वनविभागाचे अधिकारी यांनी सूचित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]