सावलीत मनीपूर घटनेचा व किरीट सोमय्या अश्लीलतेचा काँग्रेसकडून निषेध

सावलीत  मनीपूर घटनेचा व  किरीट सोमय्या अश्लीलतेचा काँग्रेसकडून सावली
 सावली प्रतिनिधी -
 मणिपूर राज्यात हिंसक जमावाकडून दोन महिलांना निर्वस्त्र अमानवी कृत्य करून बलात्कार करण्यात आला. ही घटना देशाला काळिमा फासणारी आहे व भाजपचे नेते किरीट सोमय्या हे अश्लील कृत्य करीत असल्याने या दोन्हा घटनांचा सावली तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. 
    मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यापासून हिंसाचार सुरु आहे. त्याकडे मणिपूर राज्यसरकारचे व केंद्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. त्यातही महिलांना लक्ष करून अत्याचार सुरु आहे. बेटी बचाव, बेटी पढाव च्या बाता करणारे सत्ताधारी मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे देशभरात केंद्र सरकारविरुद्ध आक्रोश सुरु आहे.
    तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नग्न अवस्थेत फोटो व व्हिडिओ काढून भारतातील समस्त महिला भगिनींचा अपमान केला, आज अश्या घृणास्पद कृत्यामुळे महिलांचा अपमान झाला. सध्याच्या वातावरणावरुन राज्यातही महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षीतते कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 
  या दोन्ही घटनांचा सावली तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनेश पा. चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भोयर,  नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा लताताई लाकडे, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक .विजय मुत्यलवार, सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमर कोणपत्तीवार, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, महिला शहराध्यक्षा भारती चौधरी,माजी उपसभापती प.स. मंगला चिमड्यालवार, नगरसेविका  साधना वाढई, अंतबोध बोरकर् आकाश येणप्रेडीवर, सुनील बोमणवार, दीपक जवादे, सुनील पाल, पंकज कागदेलवार, चक्रधर दुधे, डोमाजि शेंडे, संजय मजोके, श्रीकांत बहिरवार, अंजली दमके, शिला गुरुनुले, प्रीती गोहने, कविता मुत्यालवार आदी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर पंचायत सावलीचे नगरसेवक व सर्व फ्रंटल ऑरगॅनिझेशनचे सदस्य बहुसंख्येने सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]