राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला जोडे मारत केला निषेध - सावली तालुका काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला जोडे मारत केला निषेध - सावली तालुका काँग्रेसचे आंदोलन
सावली - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील असल्याचे वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी अमरावती दौऱ्यात केला. या वादग्रस्त विधानाचा सावली तालुका काँग्रेसच्या वतीने प्रतिमेस जोडे मारत निषेध केला.
        भिडेंच्या वादग्रस्त विधानाविरोधात सावली तालुका काँग्रेस ग्रामीण व शहर  कमिटी आक्रमक झाली असून सावली शहरात जागोजागी संभाजी भिडे विरोधात निषेध नोंदविण्यात आला. अश्या जातीय तेढ निर्माण  करणाऱ्या, देशात अराजकता पसरविणाऱ्याचे व देशातील कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना तात्काळ बंदोबस्त करा, भिडेवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
    निषेध आंदोलनात सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भोयर, माजी सभापती प.स. सावली विजय कोरेवार, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे, युवक शहराध्यक्ष अमर कोणपत्तीवार, नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा लताताई लाकडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी, बोथलिचे उपसरपंच मा.विजय गड्डमवार, हिरापूरचे उपसरपंच.शरद कन्नाके, उसेगावचे उपसरपंच सुनील पाल, माजी उपसभापती राजेंद्र भोयर, पाणीपुरवठा सभापती अंतबोध बोरकर,तसेच नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन सांगिडवार, प्रीतम गेडाम, गुणवंत सुरमवार, नगरसेविका अंजली देवगडे, राधाताई ताटकोंडावार, आकाश बुरिवार, आशिष आखाडे, किशोर घोटेकर, निखिल दुधे, आकाश खोब्रागडे, श्रीकांत बहिरवार जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा. कमलेश गेडाम,बादल गेडाम आदी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर पंचायत सावलीचे नगरसेवक व सर्व फ्रंटल ऑरगॅनिझेशनचे सदस्य सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]