सावली तालुका चंद्रपूर जिल्ह्यात कायम पाहिजे यासाठी ग्रामसभेचे ठराव परित करा - आमदार विजय वडेट्टीवार यांचे सरपंच उपसरपंच सभेत आवाहन

सावली तालुका चंद्रपूर जिल्ह्यात कायम पाहिजे यासाठी ग्रामसभेचे ठराव परित करा - आमदार विजय वडेट्टीवार यांचे सरपंच उपसरपंच सभेत आवाहन 
सावली प्रतिनिधी -  महाराष्ट्र शासनाचा सावली तालुक्याला चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्याचा प्रयत्न सुरु असून हा सावली तालुक्याला गैरसोयीचा निर्णय असल्याने ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय् वडेट्टीवार, यांनी तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचे बैठकीत याविरुद्ध ग्रामसभेचे ठराव पारीत करण्याचे आवाहन केले.
   शासनाने नुकतेच चिमूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीची घोषणा केली असून चिमुर्, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी हे तालुके जोडलेले असून त्यात सावली तालुक्याचा समावेश करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरु आहे. असे झाल्यास अंतराच्या दृष्टीने व प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने चिमूर हे गैरसोयीचे आहे . त्यामुळे सरपंच, उपसरपंच व सर्वांनी या निर्णयास विरोध करीत सावली तालुका चंद्रपूर जिल्ह्यातच कायम राहावा अशी भूमिका मांडली. तालुक्यातील पदाधिकारी यांचा सूर विरोधाचा असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातच कायम सावली तालुका ठेवण्याचा  ठराव ग्रामसभेत पारीत करण्याचे आवाहन आमदार वडेट्टीवार यांनी केले.
   यावेळी माजी जिप उपाध्यक्ष संदीप  गड्डमवार, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार,  नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लता लाकडे, सिंदेवाहीचे नगराध्यक्ष मा.स्वप्नील कावळे उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, माजी  प.स. सभापती विजय कोरेवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यलवार, शहराध्यक्षा भारती चौधरी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमर कोनपत्तीवार तसेच सावली तालुक्यातील सर्व पक्षीय सरपंच, उपसरपंच, काँग्रेस पदाधिकारी व सावली नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]