सर्प दंशाने चिधी(माल) रयतवाडी येथील मुलीचा मृत्यू. नागभिड तालुक्यातील आठवड्यातील दुसरी घटना
यश कायरकर,:

        नागभिड तालुक्यातील चिंधी (माल) येथील मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. 
      सविस्तर वृत्त, काल रात्री कु. अफसरा विलास सुतार, वय (११ वर्ष) ही आपली आजी व भावां सोबत घरात झोपेत असताना मन्यार हा विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली .
 पहाटेला 3:20  वाजताचे दरम्यान गाढ़ झोपेमध्ये असताना विषारी साप  चावल्यानंतर तिला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र तिथे पोहोचेपर्यंत अप्सराचा मृत्यू झालेला होता. 
मृतक ही कर्मवीर विद्यालय कॉलेज नागभीड येथे ५ व्या वर्गात शिकत होती. तिचे आई वडील हे उडिसा मध्ये व्यवसाय करायला गेलेले आहेत.
तिच्या जाण्याने परिवारात व गावात शोककाळा पसरली. 
ही बाब लक्षात येताच उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतिशभाऊ वारजूकर हे चंद्रपूर दौऱ्यावर असतांना चिंधीमाल येथील आशिष भाकरे यांनी घटनेची माहिती दिली असता भाऊंनी त्वरित चिंधीमाल येथे जाऊन परिवाराची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली परिवाराला सांत्वन केले व आर्थिक मदत दिली या वेळी, चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशनभाऊ ढोक, माजी नगरसेवक प्रतीक भसीन, माजी नगरसेवक संजय अमृतकर, वीलास येलशेटीवार,आशिष भाकरे,गिरीधर नन्नावरे, विकास सुतार अरविंद सुतार, इत्यादी हे उपस्थित होते.


        या पूर्वी सुद्धा १२ जुलै ला नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील अमित संतोष महाडोळे वय (१२) वर्षे याला सुद्धा सर्पदंश झाला होता त्याचा सुद्धा सर्पदंशाने मृत्यू झालेला होता.
    पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी साचल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील साप हे गावातील घरात, गोठ्यात सुकलेल्या जागेच्या शोधात येतात. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यायला हवी. आणि कोणताही विषारी साप चावला तर आधी शासकीय रुग्णालय गाठून प्राथमिक उपचार करून सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीव वाचवता येऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]