वरोरा तालुक्यातील गिरोला येथील तनुजा गोकुलदास खोब्रागडे बनली (PSI) पी.एस.आय


सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील मुलगी पी.एस.आय झाली. ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आदर्शवत प्राप्ती असून दिशादर्शक घटना आहे. वरोरा तालुक्यातील गीरोला या गावची मुलगी, तनुजा गोकुलदास खोब्रागडे, हिची पी.एस.आय. पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. तनुजा ही अगदी सामान्य गरीब कुटुंबातून वाढलेली मुलगी आहे. तनुजाचे आईवडील मोलमजुरी करतात.सावरी येथील कर्मवीर शाळेत तिचे शिक्षण पार पडले. पुढील शिक्षण तिने चंद्रपूर मधून घेतले. घरची आर्थिक परिस्थिती नसताना व कुठलेही आवश्यक संसाधन उपलब्ध नसताना तनुजाने हे यश साध्य केले आहे. हि संपूर्ण गावासाठीच नाही तर या संपूर्ण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. तनुजा ही त्या गावातील पी.एस.आय झालेली पहिली मुलगी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]