सावली पोलिसांनी दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या - चोरांकडून 8 दुचाकी हस्तगत

सावली पोलिसांनी दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या - चोरांकडून 8 दुचाकी हस्तगत
सावली प्रतिनिधी - सावली पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी वाहनांच्या चोरीप्रकरणी गुन्ह्यात केलेल्या तपासात दोन चोरट्यांकडून 8 दुचाकी हस्तगत केल्या असून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.
पोलीस स्टेशन  सावली येथे दिनांक 17/08/23 रोजी केलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 171/23 कलम 379 भा द वी अन्वये  मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद दाखल केला. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी करण महेश चेरकुरवार वय 19 वर्ष रा इंदाला ता.जि. गडचिरोली याला ताब्यात घेऊन कसून चौकशी/विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपी व त्याचा विधिसंघर्शित साथीदार रा गडचिरोली असे मिळून गडचिरोली व सावली परिसरात मोटरसायकल चोरी करतात. मुख्य आरोपी व चोरीच्या मोटरसायकल खरेदी केल्या त्यांचेकडून एकूण 08 मोटरसायकल जप्ती केल्या असून अजून काही मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे.
     सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू , उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे  यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात पोलिस हवालदार दिलीप मोहुर्ले, संजय शुक्ला , पोलिस नाईक मोहन दासरवर, धीरज पिदुरकर, विजय कोटणाके, चंद्रशेखर गंपलवार यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]