पालकमंत्री यांचे हस्ते BLO कविराज मानकर यांचा सत्कार
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1/1/2024 या अहर्ता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमची पूर्वतयारी सुरू असून त्या अनुषंगाने 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपापल्या यादी भागातील सर्व मतदारांना गृहभेटीद्वारे भेटणार असून मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलाची पडताळणी करणार आहे. या अनुषंगाने आपल्या यादी भागातील गृहभेटीचे 100% काम पूर्ण करण्याचा मान मूल तालुक्यातील यादी भाग क्रमांक 19 बेलघाटामालचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कविराज मानकर ,सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलघाटामाल यांनी पटकावला असून जिल्ह्यात अशी कामगिरी करणारे ते प्रथम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ठरले आहेत .त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी व इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने श्री.मानकर यांचा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष सत्कार 15/08/2023 रोजी केला. यावेळी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर पोलीस अधीक्षक परदेशी साहेब, अश्विनी मांजे, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी विशाल कुमार मेश्राम व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र होळी आणि नायब तहसीलदार यशवंत पवार यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे आपण सदर काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो अशी प्रतिक्रिया श्री. मानकर यांनी यावेळी बोलताना दिली. बऱ्याचशा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे गृहभेटीच काम अजूनही सुरू असून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आव्हान मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मेश्राम यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]