नागभीड जं. रेल्वेस्थानकावर जबलपुर चांदाफोर्ट २२१७३ / २२१७४ या त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस चा थांबा १५ ॲागस्ट पासुन मंजुरखासदार अशोकभाऊ नेते यांच्या प्रयत्नांना रेल्वेमंत्र्यांकडुन हिरवी झेंडी

झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याला यश              दक्षिण पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनवर पुन्हा एका नव्या सुपरफास्ट ट्रेनचा थांबा खासदार अशोकभाऊ नेते यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे मंजुर झाला असुन या मार्गावरुन धावणारी जबलपुर चांदाफोर्ट ही त्रिसाप्ताहिक ट्रेन १५ ॲागस्ट पासुन नागभीड ला थांबणार आहे. 
                     आठवड्यातून दर मंगळवार , गुरुवार व शुक्रवार ला ही गाडी या मार्गावरुन जात असते. मात्र या गाडीला चांदाफोर्ट ते गोंदिया या २६२ किमी. अंतरात एकही थांबा नसल्याने प्रवाशांची होणारी निराशा लक्षात घेत झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. या साप्ताहिक गाडीमुळे जबलपुर सारख्या पर्यटन , व्यापारी व धार्मिक स्थळी जाण्याची थेट सुविधा प्राप्त होणार आहे. 
                  २२१७४ जबलपुर चांदाफोर्ट ही त्रिसाप्ताहिक गाडी सकाळी ५.१५ ला जबलपुर हुन सुटेल व नागभीडला स. ११.४८ वा. येईल व चांदाफोर्टस्टेशनवर दु. १.४५ ला पोहचेल. तर २२१७३ चांदाफोर्ट जबलपुर ही त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन चांदाफोर्ट वरुन दु. २.५० वा सुटुन नागभीड जंक्शन स्टेशनवर सायं. ४.१९ वा . येईल व जबलपुर ला रात्री ११.३५ वा. पोहचेल. या गाडीला सध्या गोंदिया , नैनपुर व मदनमहल असे केवळ तीनच थांबे या दरम्यान मंजुर आहेत . नागभीडचा हा मंजुर झालेला थांबा प्रायोगीक तत्वावर असुन प्रवाशांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 
             या मार्गावरुन धावणाऱ्या सर्वच सुपरफास्ट ट्रेनचा थांबा या मार्गावरील महत्वपुर्ण नागभीड जंक्शन स्टेशनवर मंजुर व्हावा यासाठी खासदार अशोकभाऊ नेते यांच्या माध्यमातुन दपुम रेल्वेचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री नाम. अश्विनजी यांची मागील महिन्यात दिल्ली रेल्वेभवनात भेट घेत रेल्वेथांब्यासंदर्भात निवेदन दिले असता त्याचवेळी मंत्रीमहोदयांनी तात्काळ याबाबत सकारात्मक निर्देश दिले होते. त्याची फलक्षृती या थांब्याने प्राप्त झाली आहे. याआधी बिलासपुर चेन्नई ट्रेन तसेच गया चेन्नई या गाडीचा थांबा नागभीड येथे सुरु झालेला आहे. 
           नागभीड करांची सर्वाधिक मागणी असलेल्या चांदाफोर्ट जबलपुर ट्रेनचा नागभीडला थांबा लवकरच खासदार अशोकभाऊ नेते यांच्या पाठपुराव्याने मिळाल्याने परीसरात आनंद व्यक्त केल्या जात आहे. हा थांबा मंजुर केल्याबद्दल रेल्वेमंत्री नाम. अश्विनजी व रेल्वे राज्यमंत्री नाम. रावसाहेब दानवे व खासदार अशोकभाऊ नेते यांचे नागभीडकरांच्या वतीने संजय गजपुरे व व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्माणी यांनी आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]