तुकडोजी महाराज भवनापुढे घाणीचे साम्राज्य माजरी (प्रतिनिधी)
    माजरी (वस्ती) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिराच्यापुढे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. ग्रामपंचायत माजरीच्या  वतीने सहा महिन्यांपूर्वी काँक्रीट रोड तयार केले परंतु उंच रोड  केल्यामुळे रोडच्या कडेला पावसामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे . त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून  नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.तसेच  हा परिसर गावाच्या मध्यभागी असून सभोवताल लोकवस्ती असल्याने  लोकांची वर्दळ असते. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी जवळच असल्याने तिथपर्यंत दुर्गंधी पसरलेली आहे.जवळच बोअरवेल असल्याने पिण्याचे पाणी दुषित होत आहे.तसेच येथे साथीचा आजार येऊ शकतो . यासंबंधात  ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी आणि स्वच्छता करावी तसेच रोडच्या कडेला मुरूम टाकून उंच करण्यात यावे  अशी आग्रही मागणी  माजी ग्रामपंचायत सदस्य संध्या पोडे यांनी एका पत्राद्वारे ग्रामपंचायतला केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]