बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे मोठया उत्सहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला




मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ  मूल द्वारा संचलित *बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला* या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ऍड अनिल वैरागडे सर यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आला. तसेच मुख्य अतिथी म्हणून डॉ. टेकाडे सर प्राचार्य शासकीय कृषी महाविद्यालय मूल तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. उराडे सर चिकित्सक अधिकारी उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूल,सौं सुरभी वैरागडे मॅडम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल श्री डॉ.प्रदीप माली उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल व शाळेचे प्राचार्य विनोद सर बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल तसेच अतिथी म्हणून कुमार गीतेश गांवतुरे विद्यार्थी प्रतिनिधी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल आणि कुमारी उत्कर्षां वाळके विद्यार्थिनी प्रतिनिधी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल कार्यक्रमात उपस्थित होते प्राचार्य सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना  केली तसेच सर्व मान्यवारांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थांनी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे नृत्य व क्रीडा नृत्य व तिरंगा ध्वज ला मानवादना देण्यासाठी परेड चे प्रदर्शन करण्यात आले. आणि विद्यार्थांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले  विदयार्थचा उत्सह दिगुणित करण्याकरिता विद्यार्थना पारितोषिक देण्यात आले व कराटे व थांगता च्या अतिशय खूप सुंदर प्रदर्शन करून अतिथी,पालक,व विद्यार्थी यांना मंत्र मुग्ध केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं तोषी जयस्वाल सांस्कृतिक प्रभारी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल तसेच कुमार अंश तेलसे वर्ग 9 वा व कुमारी मानसी धाबेकर वर्ग 10 वा यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी श्रुखल खोब्रागडे वर्ग 8 वा हिने केले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगानाने झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]