महसूल दिनाचा शुभारंभ करीत महसूल दिन साजरामहसुल विभागाने वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवणे व सदरील कामे यशस्वीरित्या पार पाडणा-या अधिकारी / कर्मचारी यांचा सत्कार करण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस महसुल दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. यावर्षी शासनाने 1 ऑगस्ट हा महसुल दिन साजरा करण्यासोबतच 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा महसुल सप्ताह म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने मुल तालुक्याचे तहसीलदार व प्रभारी उपविभागीय अधिकारी मुल डॉ. रविंद्र होळी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय मुल येथे आज महसुल दिन साजरा करुन महसुल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. महसुल दिनांचे औचित्य साधत तालुक्यातील गरजुंना राशन कार्डचे वाटप करण्यात आले तसेच महसुल प्रकरणात पारित आदेशाच्या अनुषंगाने सुधारित 7/12 संबंधीतांना वितरीत करण्यात आले. तसेच आधार कार्ड व मतदान कार्डचे वाटप काही लाभार्थ्याना करण्यात आले. नायब तहसीलदार श्री. यशवंत पवार यांनी प्रास्ताविकात ब्रिटीश काळापासुनते आतापर्यंत प्रशासनातील महसुल विभागाचे महत्व विशद करत प्रशासनाच्या सर्वक्षेत्रात महसुल खात्याने आपला ठसा उमटवला असल्याचे सांगितले व महसुल सप्ताह निमित्याने 02 ऑगस्ट रोजी युवा संवादात लोकशाही व युवा याविषयावरील मुक्त परीसंवादाचे आयोजन केले असुन यात कृषी महाविद्यालय मुल व कर्मवीर महाविद्यालय मुल येथील विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे सांगितले तर 03 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा अंतर्गत तालुक्यातील गरजुंना रोख स्वरुपात व वस्तुरुपात मदत करण्यासाठी सर्व महसुल अधिकारी / कर्मचारी आणि तालुक्यातील दानशुर व्यक्तींकडून 31 हजार इतका निधी उभारला असल्याचे सांगितले, तर 04 ऑगस्ट रोजी मौजा फुलझरी येथे जनसंवादाचे आयोजन केले असुन त्याअंतर्गत संपुर्ण महसुल प्रशासन त्या गावात उपस्थित राहणार असुन तेथील जनतेच्या महसुल विभागाशी तसेच इतर शासकीय विभागाशी संबंधीत समस्या सोडविण्याचे काम मौक्यावरच करणार असल्याचे नमुद केले. तर 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी याअंतर्गत तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या महसुल विभागाशी संबंधीत मुख्यता जमीन विषयक वादांचा निपटारा करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले तर 6 ऑगस्ट रोजी महसुल विभागातीलच कार्यरत व सेवानिवृत कर्मचारी यांचेशी संवाद साधुन त्यांच्या प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणार असुन 7 ऑगस्ट रोजी महसुल सप्ताहाचा सांगता समारंभ तहसील कार्यालय मुल येथे होणार असल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात तहसीलदार होळी यांनी आज जरी ए. आय. म्हणजे आर्टीफिसीयल इन्टेलिजन्स पर्यंत आपण मजल मारली असली तरी मॅन बिहाइन्ड मशीन हे महत्वाचे असुन माणसाचे महत्व तहहयात राहणार आहे. त्यामुळे ई-पंचनामा, ई-पिकपाहणी, ई-चावडी, ई-महाभूमी व ई- रेशन कार्ड यात ओ. आय. चा सहभाग असला तरी त्यामागे कार्यरत शक्ती म्हणजे महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारीच होय यामुळे महसुल विभागाचे महत्व कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राबविण्यात येणा- या महसुल सप्ताहात महसुल विषयक प्रलंबीत प्रकरणे निकाली काढुन घेण्यासाठी पुढे येण्याचे आव्हान उपस्थित नागरीकांना केले. यावेळी नायब तहसीलदार ओंकार ठाकरे व राम नैताम यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. सरते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. दिपक गोहणे, मंडळ अधिकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन कु. डेझी गायकवाड, तलाठी यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या वेळी संपुर्ण महसुल अधिकारी व कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक मोठया संख्येनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]