माजी सैनिक आणि स्वच्छता मित्राचा सन्मान करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
 स्वातंत्र्यासाठी ज्या विरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेफडो परिवार मुलच्या वतीने आपली सेवा पुर्ण करुन आलेल्या वरिष्ठ माजी सैनिक सन्मा. सहदेवजी रामटेके,सन्मा.मदनजी येडट्टीवार, सन्मा.मारोतीजी कोकाटे, सन्मा.लक्ष्मणजी निकुरे,
 सन्मा.बाबा सुर यांचा सपत्नीक, माजी सैनिक पत्नी श्रीमती सुगंधाबाई खोब्रागडे, श्रीमती नलिनी मेश्राम आणि २०१७  पासून प्रत्यक्ष कृतीतुन स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे स्वच्छता मित्रा सन्मा.गौरव शामकुळे यांचा नवभारत कन्या विद्यालय मुल येथे शाल, सन्मान चिन्ह आणि रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या विरांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  ७५ दिवे लावुन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर वृक्ष पुजा, वृक्ष प्रतिज्ञा, आणि देशभक्तीपर गीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा तसेच प्रमुख पाहुणे श्रीकांत समर्थ पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता नगर परिषद मुल, अशोक झाडे मुख्याध्यापक नवभारत विद्यालय, रत्नमाला भोयर नागपूर विभाग सल्लागार तथा माजी नगराध्यक्षा, गुरुदास चौधरी सहसचिव नागपूर विभाग,अल्का राजमलवार मुख्याध्यापिका नवभारत कन्या विद्यालय मुल तथा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.मनोगतात सत्कारमूर्ती आणि त्यांच्या पत्नींनी सेवेत असतानाचे आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिरा शेंडे मुल तालुका अध्यक्षा आणि कल्पना मेश्राम मुल तालुका संघटिका यांनी तर आभार प्रदर्शन किसन खोब्रागडे मुल तालुका संघटक यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेफडो परिवाराने परिश्रम घेतले.
याप्रसंगी तेजस्विनी नागोसे, रत्नमाला भोयर, रत्ना चौधरी नागपूर, ललिता मुस्कावार, श्रीरंग नागोसे, कविता मोहुर्ले, गुरुदास चौधरी, अल्का राजमलवार, राकेश ठाकरे, बबिता गेडेकर, स्मिता बांडगे, मिरा शेंडे, कुमुदिनी भोयर,राखिता नागोसे , माधुरी गुरनुले, वंदना गुरनुले,इंदु मांदाडे, कल्पना मेश्राम, शशिकला गावतुरे, सुनिता खोब्रागडे, यशवंत देवगडे,किसन खोब्रागडे सुजाता बरडे,मुल शहर सचिव नितु कटकुरवार, मुल शहर संघटीका सपना निमगडे, पर्यावरण प्रेमी शेंडे सर,मांदाडे सर,गेडेकर सर,साधना चिताडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]