अंगणवाडीच्या ४२ मुलांना गणवेशाचे वाटप: देवता सुर्यवंशी याचे उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

अंगणवाडीच्या ४२ मुलांना  गणवेशाचे वाटप: देवता सुर्यवंशी याचे उपक्रमाचे सर्वत्र कौतुकतळोधी (बा.) नागभिड तालुक्यातील जनकापूर येथिल अंगनवाडीच्या बेचाळीस मुला मुलींना सामाजीक कार्यकर्ती देवता सुरेश सुर्यवंशी यांनी गणवेशाचे वितरण केले. त्यामुळे अंगनवाडीच्या मुलांमधे आनंदाचे वातावरण दिसत होते. शिक्षणाचा पाया असलेली अ़ंगनवाडी मधेच मुलांना संस्काराचे धडे गिरवले जातात मात्र शासनाकडून अद्यापही अंगनवाडीच्या मुलामुलींना गणवेश दिलें जात नाही त्यामुळे स्वतंत्र दिन व गणराज्य दिन या राष्ट्रिय सणाला सुध्दा अंगणवाडीच्या मुलामुलींना हिरमुसले व्हावे लागतो. मात्र या मुलांसाठी जनकापूर येथिल समाजीक कार्यकर्त्या व शाळा समितीचे उपाध्यक्ष देवता सुरेश सुर्यवंशी यांनी यावर्षी स्वतंत्र दिनानिमित्त अंगणवाडीच्या बेचाळीस मुलामुलींना स्वखर्चातुन गणवेशाचे वाटप केले. याबद्दल शिक्षण समितीचे अध्यक्ष परमेश्वर नान्हे, आझाद सिंग जुनी, प्रेरिका सत्यवती रामटेके, सेविका बेबीताई बोरकर, अश्वीनी पडोळे, मदतनिस सुभद्रा पडोळे, अश्वीनी रामटेके आदींनी देवताबाई सुर्यवंशी हिचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]