अतिवृष्टी पाण्यामुळे भद्रावती वरोरा तालुक्यातील अनेक मार्ग बंद.. परिसरातील गावातील अनेक शेतजमीन पाण्याखाली ...



नागरिकांनी केली फुलांची उंची वाढवण्याची मागणी...


वरोरा.. जगदीश पेंदाम

भद्रावती, वरोरा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद पडली असून वाहतूक ठप्प पडलेली आहे, तालुक्यातील चंदनखेडा ते आष्टा, शेगाव ते चंदनखेडा, अर्जुनी ते शेगाव खडे जाणार पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे भद्रावती,चंदनखेडा, शेगाव, चिमुर मार्ग बंद पडली त्याचप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या कपास ,तूर ,सोयाबीन पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, वरोरा तालुक्यातील परिसरातील चारगाव मध्यम प्रकल्प धरणाच्या महापुरामुळे येथील परिसरातील नाले, नहर ओवर फ्लो भरून वाहत असून हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली आली असून शेतात असलेल्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत असून अतिवृष्टी पाण्यामुळे बहुतांशी गावचे संपर्क तुटलेल्या असून ठीक ठिकाणी असलेल्या पुलाच्या कमी उंचीमुळे अनेक गावांच्या संपर्क तुटला यामध्ये अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, किनाळा, धानोली,दादापूर, आष्टा, मानोरा, वायगाव, चारगाव आदी गावांच्या समावेश आहे.. 

वारंवार शासनाला अर्जुनी गावाच्या नागरिकांनी फुलांची उंची वाढवण्याचे मागणी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणाऱ्या अतिवृष्टी पावसामुळे नागरिकांना वरोरा,शेगाव या ठिकाणी दळणवळण,दवाखाना, शिक्षण इतर कामासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून मृत्यू पावलेल्या नागरिकांचे प्रेत आणण्याकरिता सुद्धा नागरिकांना अडचणी निर्माण होत असून फुलांची उंची वाढण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]