तुझ्यात मी ' चित्रपट कलाकारांचे जल्लोषात स्वागत' तुझ्यात मी ' चित्रपट कलाकारांचे जल्लोषात स्वागतसावली -(दि.9/8/2023) जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने पाथरी या आदिवासी बहुल गावात ' बेरा - एक अघोरी ' व नुकताच प्रदर्शितत झालेला मराठी चित्रपट ' तुझ्यात मी ' च्या शक्तीविर धिराल, जेस डेझा, संजय राम, मनोज तोकला, अजय गझल या कलाकारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रॅलीचे आयोजन करण्यात आले. आदिवासी बांधवांबरोबर गावातील असंख्य लोक रॅलीत सहभागी झाले होते. चित्रपटाच्या कलाकारांना बघण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्ततात कलाकारांना कार्यक्रम स्थळी नेण्यात आले.
   कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी नेतेमंडळी कडून करण्यात आला. कलाकारांच्या सत्काराबरोबरच आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शक्तीविर धिराल यांच्या सत्काराबरोबर जेस डेझा, संजय राम, मनोज तोकला, अजय गज्जल यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी बोलताना शक्तिविर धिराल यांनी सांगितले की, विदर्भ ही कलाकारांची खाण आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्या प्रतिभा व कला, अश्या सुप्त गुणांना ओळखून त्या जगासमोर मांडल्या पाहिजे. ते म्हणाले की भविष्यात चित्रपटाची निर्मिती करतांना विदर्भा च्या कलाकारांना प्राधान्य दिले जाईल. कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर डॉ. विजय निरंजने, पाथरी पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक मुकुंद मोहोड, शेख साहेब, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी समाजाचे अध्यक्ष रतन मेश्राम, विराज सुरपाल, इ. नी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]