विद्यार्थ्यासाठी काँग्रेस सरसावली

आगार प्रमुखांना दिले निवेदन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील अनेक गावात अनियमित बस फेऱ्या येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले असून याची दखल घेत काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे बस आगार प्रमुख चिमूर यांना निवेदन देत बस फेऱ्या वाढविण्याची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील व राजू कापसे यांनी केली.

         चिमूर कांपा मार्गावरील सिरसपूर,शिवरा, कवडशी (डाक), मेटेपार, मांगलगाव,पिंपळगाव , कोटगाव,जांभूळघाट, पारडपार, आंबेनेरी, मालेवाडा,सावरगाव, कारघाटा ,उमरी ,खरकाडा, गडपिपरी येथील जवळपास २०० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असून मात्र बस फेऱ्या वेळे वर येत नसल्याने विद्यार्थ्याना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर विद्यार्थ्याना ताटकळत उभे राहावे लागत आहे.मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्याना शिक्षण मिळावे यासाठी चिमूर तालुका काँग्रेस ने दखल घेवून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांसह बस आगार प्रमुख यांचेशी भेट घेवून निवेदन दिले. 

  बस आगार प्रमुख यांना निवेदन देत असताना काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ .विजय गावंडे पाटील, माजी पस सदस्य राजू कापसे, माजी जीप सदस्य तथा काँग्रेस ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष , विलास डांगे, शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे ,मिडीया प्रमुख पप्पूभाई शेख , तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नांगेद्र चट्टे , जेष्ठ काँग्रेस नेते केशवरावजी वरखेडे, धनराजजी मालके ,तालुका उपाध्यक्ष राजु चौधरी,देवानंद गावंडे,छतृगण पराते,बापूराव घोडमारे, घनश्याम रामटेके,भाऊजी टेकाम, जाबिर कुरेशी,मसूद इस्माईल शेख,शहनाज शेख व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]