शाळा व्यवस्थापन समितिकडून सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा - मुलाकत, आदेशानंतरही रुजू करण्यास नकार

शाळा व्यवस्थापन समितिकडून सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा - मुलाकत, आदेशानंतरही रुजू करण्यास नकार
सावली प्रतिनिधी - शिक्षण संस्थेचा कारभार पाहण्याचा अधिकार आपलाच म्हणून शिक्षक पदाकरिता वर्तमान पत्रात जाहिराती देऊन मुलाकत घेतल्या जाते. मुलाकतीत पात्र ठरलेल्या सुशिक्षितांना संचालकाकडून नियुक्ती आदेश दिल्या जाते परंतु आम्हाला हा आदेश मान्य नाही म्हणून मुख्याध्यापक रुजू करून घेण्यास नकार देतो. अशाप्रकारे सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा केल्या जात असल्याचा प्रकार योगीराज श्री विकतुबाबा शिक्षण संस्था जुनासुर्ला व सिद्धार्थ हायस्कुल लोंढोली यांच्या असमन्वयामुळे घडत आहे.
       सिद्धार्थ हायस्कुल लोंढोली ता. सावली येथे इयत्ता 8 ते 10 असून 4 कर्मचारी कार्यरत आहेत. शैक्षणिक दृष्टीकोनातून रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. शाळा ही अल्प संख्यांक दर्जाची  असल्याने शिक्षक भरती घेता येते. त्यानुसार योगीराज श्री विकतुबाबा शिक्षण संस्था जुनासुर्ला संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ रामटेके व सचिवानी शिकणसेवकाच्या 3 पदाकरिता लोकसत्ता व नवभारत वृत्तपत्राला जाहिरात दिली. सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधात असल्याने जाहिरात बघून मुलाकत दिली. संस्था पदाधिकारी यांनी मुलाकतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले. उमेदवार नोकरी लागल्याच्या आनंदात नियुक्ती आदेश घेऊन रुजू होण्यास शाळेत दाखल झाले मात्र येथील मुख्याध्यापक शामराव गाढवे यांनी नवनियुक्त उमेदवारांना रुजू करण्यास नकार दिला. त्यामुळे तीनही उमेदवारांना हिरमुसले होऊन परत जावे लागले. संस्थेच्या आपसी वादात सुशिक्षित बेरोजगारांची या पद्धतीने थट्टा चालविल्याने संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या वादामुळे शिक्षणावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मी संस्थेचा अध्यक्ष असल्याने पदभरती करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुलाकत घेऊन नियुक्ती आदेश दिले. मुख्याध्यापकांनी रुजू करून घ्यायला पाहिजे. याबाबत मी शिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार करणार आहे.
सिद्धार्थ रामटेके
अध्यक्ष योगीराज श्री विकतुबाबा शिक्षण संस्था जुनासुर्ला

सिद्धार्थ रामटेके हे संस्थेचे अध्यक्ष नसून संचालक मंडळ बरखास्त झालेले आहे. कोणतेही पद भरतांना शाळा समितीला  विश्वासात न घेता पद भरणे चुकीचे आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना रुजू करण्यास नकार दिला आहे.
शामराव गाढवे
मुख्यध्यापक सिद्धार्थ हायस्कुल लोंढोली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]