स्व. लताताई पिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजनदान....
वरोरा... जगदीश पेंदाम

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळ महाडोळी, वरोरा येथील या मंडळाच्या अध्यक्षा स्व.लताताई नथ्थुजी पिसे यांचा कोरोणाच्या महामारीमध्ये मृत्यू झाला. महाडोळी येथील ग्रामस्थ मंडळींच्या प्रत्येक जनसेवेच्या कार्यात त्या प्रत्येकांना सहकार्य करायच्या, शेतकरी कुटुंबातून मार्ग काढीत त्यांनी समाजाच्या इतर मुलांबरोबरच स्वतः च्या मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांचा सर्वात मोठा मुलगा रूपेश पिसे हे व्यावसायिक असून दुसऱ्या नंबरचे पंकज पिसे हे हायस्कूल शाळेमध्ये शिक्षक आहे तर तिसरा मुलगा डाँ. आशिष पिसे हे त्यांचे वडील आहेत. त्यांचे तिनही मुले एकत्र येवून कसलाही तेरवीचा कार्यक्रम न करता आनंदवनातील अंध विद्यालय व मुकबधीर विद्यालय, आनंदवन येथील विद्यार्थ्यांना आईच्या स्मृती दिनानिमित्त भोजनदान केले. कसलाही कार्यक्रम न घेता स्व. लताताई नथ्थुजी पिसे यांच्या प्रतिमेला हारापर्ण करून डाँ. आशिष पिसे यांचे मोठे वडील प्रा. महादेवराव पिसे चिमूर यांनी लताताईच्या जीवन चरित्र्याबद्दल माहिती दिली. डाँ. आशिष पिसे सुद्धा यांनी आपल्या मातोश्री बद्दल बरीच माहिती सांगितली. परिवारातील सर्व सुना व नातवंडे या स्मृती दिनाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले होते. यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. देवतळे साहेब, डाँ. नितीन देवतळे बालरोग तज्ञ व त्यांचे नातेवाईक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम परमानंद तिराणिक कलाशिक्षक यांनी पिसे कुटुंबीयांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. आनंद अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर यांनी शाळेबद्दल माहिती दिली. मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर सर, कृष्णा डोंगरवार, साधना ठक, तनुजा सव्वाशेरे, वर्षा उईके, माला भट, विलास कावणपूरे व दोन्ही शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाला शेवटी अंध विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली व लताताईंच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहण्यात आली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]