नागभीड येथे रानभाज्या महोत्सव उत्सवात साजरा

नागभीड तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहात दि.१४/०८/२०२३ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव व  पीएमएफएमइ कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन सौ. प्रणाली खोचरे गटविकास अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांची उपस्थिती होती. 
              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रानभाज्या महोत्सवाचा उद्देश, पीएमएफएमइ योजने याबद्दल कु.पी एस शिंदे तालुका कृषी अधिकारी, नागभीड यांनी माहिती दिली. पीएमएफएमइ योजनाचे बँकेचे निकष आदी विषयावर श्री. शरणम दुधे  (व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया) व श्री. विनोद धरवळ  (व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया) यांनी मार्गदर्शन केले. 
            आपले आयुष्य निरोगी, बळकट-काटक करायचे असेल, तर सर्वांनी आपल्या आहारात रानभाज्याचा समावेश करावा असे आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गजपुरे यांनी केले. रानभाज्या माणसांना विविध प्रकारच्या आजारापासून दूर ठेवतात, त्यामुळे सर्वांनी त्याचे सेवन करावे असे सौ.प्रणाली खोचरे गटविकास अधिकारी, नागभीड यांनी सांगितले, तर रानभाज्या मध्ये असलेले विविध औषधी गुणधर्माची माहिती सौ. अर्चना फुलसंदर उपविभागीय कृषी अधिकारी, नागभीड यांनी दिली.या कार्यक्रमात तालुक्यातील विविध महिला गट, आत्माचे गट, वैयक्तिक शेतकरी यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या  प्रदर्शनात मांडल्या.
           या कार्यक्रमास श्री.एस बी हजारे सहायक वनक्षेत्रधिकारी नागभीड,श्री. वामन टेम्भूर्णे मंडळ कृषी अधिकारी नागभीड, श्री. नैतामे कृषी अधिकारी, श्री. जितेंद्र कावळे तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तसेच मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सी एस दाडगे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. एस ए पाकमोडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील सर्वांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]