महसूल सप्ताह अंतर्गत समाजातील वंचित घटकापर्यंत जाऊन मतदान नोंदणी बाबत जनजागृती मोहीम सुरू

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - महसूल सप्ताह अंतर्गत समाजातील वंचित घटकापर्यंत जाऊन मतदान नोंदणी बाबत जनजागृती केली जात आहे. या अंतर्गत पवनी तालुक्यातील मौजा नेरला येथील भटक्या विमुक्त जाती / जमातीच्या शिखलगार समाजामध्ये सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र सोनोने  पवनी, नायब तहसीलदार महेंद्र चौधरी, एन. के. शेंडे मंडळाधिकारी अड्याळ, तलाठी,पोलीस पाटील, माजी सरपंच, बीएलओ, ग्रा.प. सदस्य पोहोचले. भटक्या समाजातील वस्तीवर नव मतदार ची नोंदणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मार्फत केली. तसेच मयत दुबार स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे दुरुस्तीचे फॉर्म लोकांकडून भरून घेण्यात आले. राशन कार्ड ,जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र याबाबत त्यांच्या अडचणी ऐकून नियमानुसार तात्काळ निकाली निघण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]