डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुमित गेडाम यांचा मृत्यू कुटुंबीयांनी केला पत्रकार परिषदेत आरोप दोषीवर कारवाईसाठी पोलीस स्टेशन मुलला दिली तक्रारमूल प्रतिनिधी 
आपला मुलगा सुमित गेडाम यांच्या मृत्यूला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतकाचे कुटुंबीयांनी   आज प्रेस क्लब मूल येथे पत्रकार परिषदेत केला.
मूल शहरातील वार्ड क्र ११इंदिरा नगर मूल येथील वास्तव्यात राहत होते मजूरी करून कुटूंब चालवित असताना अचानक दि.  १०/८/२०२३ला सुमित सुभाष गेडाम यांची तब्येत अचानक बिघडली असल्याने उपजिल्हा रुग्णालय मूल येथे भरती करण्यात आले परंतु ११/८/२०२३लाअंदाजे दुपारी १२:००वाजताच्या दरम्यान सुमित यांची तब्येत चिंताजनक झाली असल्याने त्यावेळी द्वारका सुभाष गेडाम यांनी कर्तव्यावर असणार्या परिचारिका यांना स्वतः जावून माझ्या मुलाची तब्येत बिघडली आहे तुम्ही तात्काळ येवून माझ्या मुलाचा उपचार करावे अशी विनंती केली असता व संबंधित डाॅक्टरांना लवकर बोलावणे करावे अशी विनंती केली असता संबंधित परिचारिका यांनी उद्धट भाषेचा वापर करून मला एवढेच काम आहे का तुम्हाला गरज आहे तुम्ही बोलवा डाॅक्टरला असे बोलत अपमानित बोलून तरूणांच्या आईला ढकलून दिले त्यानंतर रूग्णालयात भरती असणारे रूग्ण आकाश येसनकर यांनी रूग्णाच्या आईची आपबिती बघून त्यांनी रूग्णाच्या आईला डाॅक्टर कडे घेवून गेले असता संबधी डाॅक्टरांनी तिला सिरयस पेशन्ट तपासायचे आहे मला वेळ नाही मी थोड्या वेळाने येतो असे बोलत तिला हकलून दिले माझे जावई डेव्हिड खोब्रागडे दवाखान्यात आले असता त्यांनी सुध्दा संबंधित डाॅक्टर कडे चारदा रुग्णालयात भरती असणारे रूग्ण सुमित गेडाम याच्येवर उपचार करावे म्हणून विनंती केली असता त्यांचेवर सुध्दा विनंतीचा मान न ठेवता माझ्या मुलावर उपचार केले नाही तब्बल तिन ते चार तासांनी संबंधित कर्तव्यावर असणारी परिचारिक यांनी रूग्णालयात कुठल्याही प्रकारचा उपचार न करता आम्हाला जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे तात्काळ घेवून जाण्याचे रेफर केले
चंद्रपूर येथे रूग्नवाहिकेत जात असताना वाटेतच सुमित याचा जीव गेल्याने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय डाॅक्टारानी रूग्ण सुमित गेडाम यांना मृत घोषित करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]