भरधाव दुचाकी ची अज्ञात वाहनाला धडक, दुचाकी चालक युवक ठार.

भरधाव दुचाकी ची अज्ञात वाहनाला धडक, दुचाकी चालक युवक ठार.
तळोधी (बा.):
 तळोबी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सिंदेवाही - तळोधी रोडवर सावरगाव नजीक चिखलगाव येथील युवक प्रशांत नरेंद्र मेश्राम वय 23 वर्षे हा अपघातात ठार झाल्याची घटना आज सायंकाळला घडली.
मृतक युवक हा सावरगाव कडून चिखलगाव कडे आपली हिरो कंपनी ची दुचाकी क्रमांक एम एच 34 बी ई 0446 ने जात असताना अज्ञात वाहनाला धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार प्रशांत हा डोक्याला गंभीर मार लागुन अतिरक्तस्राव मुळे घटनास्थळी ठार झाल्याचे निदर्शनास आले.
   तळोधी बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता  नागबीड येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]