प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव बु. येथील उर्वरित बांधकाम पूर्ण करून जनतेच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करा
वरोरा.... तालुक्यातील शेगाव हे मोठे गाव असून  येथे मागील पाच ते सहा वर्षापासून आरोग्य केंद्राची इमारत करोडो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले परंतु परिसरातील जनतेला मात्र आरोग्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे...

शेगाव तालुक्यात मोठे गाव म्हणून ओळख निर्माण केलेली असून लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे परिसरातील 50 ते 60 जनता शेगावला रोज खाजगी दवाखान्यात उपचाराकरीता येत असून या ठिकाणी उभी असलेली करोड रुपयाची इमारत धुळखात पडलेली असून प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन शालेय विद्यार्थी, लहान मुले, महिला, नागरिकांसाठी आरोग्य उपचार करीता, उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा आरोग्याच्या प्रश्न दूर होईल,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे वॉल कंपाऊंड ,गेट ,इतर बांधकाम पूर्ण करून प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या सुविधे करता लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांना निवेदनातून प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांनी केलेली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]