घोडाझरी नहराचा उपसा करण्याची लाभधारक शेतकरी वर्गाची मागणी.

तळोधी बा:
        यावर्षी नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव १०० टक्के भरून ओव्हर फोल्हो सुरू आहे. या घोडाझरी तलावा च्या अंतर्गत जवळपास ७५०० हजार च्या वर हेक्टर जमीन ओलीताखाली येत आहे. या तलावाच्या मुख्य प्रवेशद्वार पासून  ६ किलोमीटर अंतरावर घोडाझरी नहराचा दोन पाणी वाटप करणारे वितरिका आहेत. यामध्ये तळोधी बा. नहर वितरिका व दुसरी नवरगाव वितरिका आहे. पाणी वाहून नेणाऱ्या घोडाझरी नहराचा दुरस्ती न केल्याने अनेक ठिकाणी खाचे पडले आहे. तसेच या नहरामध्ये  झाडे झुडपे वाढले असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या घोडाझरी नहराचा पाणी सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वानेरी वाकल पर्यंत जात असते. मात्र सिंचाई विभागाकडून अजूनही कुठल्याही प्रकारचा नहराचा उपसा करण्यासाठी प्रयत्न केला जात नसल्याने घोडाझरी लाभ क्षेत्रात शेतकरी वर्ग चिंतन करीत आहे. घोडाझरी नहराचा ताबडतोब उपसा करून ओव्हर फोल्हो जाणारे पाणी धान रोहणी करण्यासाठी नहराद्वारे सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 
कोट 
 घोडाझरी नहराच्या मुख्य वितरिकावर झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढले असून पर्यंत सिंचाई विभागाकडून नहराचा उपसा न केल्याने ताबडतोब घोडाझरी नहराचा पाणी सोडण्यापूर्वी नहराचा उपसा करावा अशी मागणी घोडाझरी क्षेत्रातील लाभ धारक यांच्या कडून केली जात आहे. 
चिंतामण बोरकर
कन्हाळगांव सोनुली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]