इलेक्ट्रिक करंट चा शॉक लागल्याने ग्राम पंचायत सदस्याचा मृत्यू

शंकरपूर येथील घटना

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे (RO) प्लांट च्या चॅनल गेट ला इलेक्ट्रिक करंट आल्याने ग्राम पंचायत सदस्य जागेवरच मृतचीत पडला याची माहिती काँग्रेस पार्टीचे डॉ.सतीश वारजूकर चिमूर - ७४ विधानसभा समन्वयक यांना मिळताच क्षणी घटनास्थळ गाठून मृतचीत पडलेल्या संजय मनीराम नन्नावरे यांना रुग्णवाहिकेत नेत असतांना सोबतच स्वतःच्या चार चाकी वाहनाने तात्काळ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आले.त्यावेळी स्वासोस्वास सुरू होते.रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी मृतचीत रुग्णास मृत घोषित केले. यामुळे शंकरपूर वासीयांमध्ये शोककळा पसरली असून त्यांचा परिवारात आई पत्नी व दोन  मुले तसेच एक भाऊ असा परिवार आहे. ते सतत दोनदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच मनमिळाऊ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची कामगिरी होती. मृतक संजय मनीराम नन्नावरे यांचे वय अंदाजे ४० वर्ष होते. ते मूळचे शंकरपुर येथील रहिवासी असून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली असून पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]