सेतू सुविधा चालकांचा मनमानी कारभार थांबवावा

शासकीय दरापेक्षा जास्त आकारली जातात दर

नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी तर्फे चिमूर तहसीलदार यांना दिले निवेदन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२५/८/२०२३ ला नेरी शहर व्यापारी असोसिएशन,नेरी मार्फत चिमूर तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना नेरी मध्ये जी काही आपले सरकार, महा ई सेवा केंद्र तसेच आधार कार्ड च्या ज्या सेवा चालू आहेत व या सर्व सेवा चालवत असतांना सेतू सुविधा चालक यांचा जो मनमानी कारभार तसेच अवाजवी दर आकारून शासनाच्या शुल्काची पायमल्ली करून सर्व सामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची नेरी शहरा मध्ये लूट चालवलेली आहे ती तात्काळ थांबवावी आणि लूट करीत आहे असे आढळून येताच क्षणी सेतू केंद्राची परवाने रद्द करण्यात यावी अशी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी व्यापारी असोसिएशन नेरी यांनी केली. यावेळी नेरी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष मंगेश चांदेकर, सचिव  राजु पिसे, गुलाब कामडी, विलास  चांदेकर, सहसचिव रवि चुटे , कोशाध्यक्ष  विलास पिसे उपस्थित होते. या सेतू सुविधा चालकांवर योग्य कार्यवाही करून यांचे परवाने रद्द करण्यात येईल असे आश्वासन चिमूर च्या तहसीलदार बुरांडे यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]