सामाजिक बांधीलकी जपत श्री.आकाश येसनकर यांच्या वाढदिवस डेबू सावली वृध्दाश्रम देवाळा (चंद्रपूर) येथे साजरा.मूल प्रतिनिधी 
आज दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोज गुरुवारला युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व मुल मधील रहवासी,सर्व मित्राचे लाडके मनमिळाऊ स्वभावाचे सामाजिक युवा कार्यकर्ते श्री. आकाश येसनकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून,त्याचा जन्म सार्थकासाठी झालेला आहे याचे प्रमाण दाखवून,त्याचा वाढदिवस डेबू सावली वृध्दाश्रम देवाळा (चंद्रपूर) येथे, वुद्धा‌चे समावेत साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित डेबूजी वुद्धा‌श्नमातील जेष्ठ, महिलांचे हातून औक्षण करून व वाढदिवस गीत सादर करून त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्याकडून अश्याच प्रकारचे कार्य सतत घडत राहण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, वाढदिसानिमित्त वुद्धा‌श्नमातील परिसरात बोधीवृक्ष पिंपळाचे झाडे लावण्यात आली शांततेचं प्रतीक सोबतच प्राणवायूचा सन्मान,नाहीतर आजकाल वाढदिवस म्हटला की, मोठेपणा दाखवण्याची हौसेच्या नादात लोक रस्त्याने उनाडक्या करताना दिसतात ,यासाठी लाखो रुपयांचा अपव्यय केला जातो. या सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधीलकी जपत श्री.आकाश येसनकर यांनी वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून नवा आदर्श निर्माण केला. श्री आकाश येसनकर हें वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवीत असतात .ज्यामध्ये वृक्षारोपण,शाळेतील मुलांना शैक्षणिक वस्तू भेट देणे, रुग्णालय येथे फळ वाटप करणे, रक्तदान शिबीर,अश्या अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच घेत असतात.डेबूजी वुद्धा‌श्नमातील वृद्धांन सोबत केक कापण्यात आला आणि काही प्रमाणात खान पणासाठीची साहित्याचे सुध्धा अर्पण करण्यात आले.वृद्धाश्रमात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी डेबूजी वुद्धा‌श्नमातील संचालक मंडळ व ३० वृद्ध पुरुष महिला उपस्थित होते. मुल येथील युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थचे अध्यक्ष श्री. प्रणित पाल , उपाध्यक्ष श्री. निखिल वाढई , कोषाध्यक्ष श्री. निहाल गेडाम , रोहित भट्टे, तसेच श्री दिलीपजी गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला तेव्हा डेबूजी वुद्धा‌श्नमातील वृद्धांचे मन बहरून आलेअन् सगळ्यांना प्रसंनता वाटली .यातच माझ सुख दडले अशी भावना श्री आकाश भाऊ येसनकर यांनी व्यक्त केली सर्वांचे आशीर्वाद घेऊन जन्मदिवसाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]