योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य मुक्त जीवन आणि बचत गटाच्या माध्यमातून आकाशी झेप योग पतंजली समीती मुल
योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना निरोगी जीवन जगण्यासाची सहानुभूती देत तसेच वासल्य बचत गट स्थापन करून एकत्र कुटुंब/परिवार निर्माण करण्याचे श्रेय  योग पतंजली बचत गटांनी केलेला आहे तसेच यांच्या माध्यमातून विदेशी भरारी घेण्याचा उत्साह आज प्रेस क्लब च्या पत्रकार परिषदेत त्यांनी बोलत होते या वेळी योग पतंजली समीती अध्यक्ष प्रभाकर भोयर उपाध्यक्ष तथा योग प्रशिक्षक अनिल गांगरेड्डीवार सचिव दिलीप पोकळे रत्नमाला भोयर किशोर भडके रवि कोल्हटवार उपस्थित होते

पतंजली योग समिती मूल यांनी स्पष्ट केले.योग पतंजली समिती मूल ची स्थापना २०१२-१३या आर्थिक वर्षात करण्यात आली, आणि त्या माध्यमातून दररोज सकाळी ५ ते ७ या वेळात योगा, प्राणायाम ध्यान आणि प्रार्थना केली जाते. पुढे याच माध्यमातून लोक जोडून ठेवण्यासाठी एका बचत गटाची स्थापना करण्यात आली यांत २८१लोकांनी २००₹प्रमाणे शुल्क भरुन सदस्यत्व स्वीकारले.आणि सदस्यांमध्ये संवाद, आत्मियता आणि सलोखा वाढावा म्हणून दरमहिन्यात एकदा ६-७सदस्यांनी एकत्र येत सामुहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागला.ह्याला वाढता प्रतिसाद मिळाला आणि ह्या समितीतील सदस्यांनी मान.नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे एक विनंती अर्ज सादर करुन स्वामी रामदेव बाबा यांना मूल नगरीत आमंत्रित करून एक महाशिबीर घेण्याची इच्छा प्रकट केली.या विनंती अर्जानुसार २०१८च्या १९,२०आणि२१फेब्रुवारी रोजी मूलमध्ये कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणात एक भव्यदिव्य महाशिबीर आयोजित करून ते यशस्वी करण्यात योग पतंजली समिती मूल च्या पदाधिकारी यांना प्रचंड यश मिळाले.

त्यानंतर योगाकडे वळणाऱ्यांची संख्या एकदम वाढली ,याच दरम्यान योग पतंजली समिती मूल च्या वतीने नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे योगाभवन साठी मागणी करण्यात आली.
नगराध्यक्षा सौ रत्नमाला भोयर यांनी इतर नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या सहकार्याने मूल नगरपरिषदेच्या माध्यमातून एक ठराव घेऊन तो मंजूर केला व ही मागणी नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करण्यात यश मिळवले.८८लक्ष रुपये खर्च करून महाराष्ट्रातील एक आगळेवेगळे योगाभवन पूर्णत्वास जाऊन १८/०७/२०२१रोजी त्याचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान.नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

याच २०२१साली वात्सल्य बचत गटाची स्थापना करण्यात आली ,११०१₹प्रतिमाह याप्रमाणे सदस्य शुल्क घेऊन बचत गटाची नोंदणी करण्यात आली आणि त्या माध्यमातून बचत गटातील ११०व्यक्तींना आम्ही नागपूर वरुन विमानाने दिल्लीला व तेथून पुढे काश्मीर व वैष्णोदेवी व परत असा अकल्पित आणि कित्येकांना केवळ स्वप्नच वाटावे असा प्रवास विमानाने घडवून आणला. अशाप्रकारच्या सहलीचे आयोजन आम्ही नियमित करीत असतो , व अशक्य वाटणाऱ्यांना ते शक्य करून दाखवतो. हा आमचा विशेष उल्लेखनीय टप्पा कारण मोलकरीण व मोलमजुरी करणारे यांनाही या प्रवासाचा आनंद घेताना बघून त्यांच्या डोळ्यातील तो आनंद आमचा आनंद द्विगुणित करुन गेला.
त्यानंतर आम्ही केवळ विदेशवारी घडवून आणण्यासाठी वारी गटाची स्थापना केली व सदस्य शुल्क ठेवलेआहे,३१००₹ प्रतिमाह या माध्यमातून आम्ही ४०लोकांचा एकत्र जोडलेले आहेत आणि सर्वानुमते विदेशवारी करण्याचा मानस आहे.
मूलमध्ये आधी १०-१२ठिकाणी योग साधना केंद्र चालवले जात होते , परंतू जागेचा अभाव , पाऊसपाणी यांमुळे इतर केंद्र बंद करण्यात आले असले तरी योगाभवन मध्ये दररोज ७०-७५साधक आपली उपस्थिती दर्शवितात त्यापैकी किमान ५० साधक नियमित उपस्थित असतातच असेही याप्रसंगी मान्यवरांनी स्पष्ट केले. तसेच २१जून रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नगरात प्रभातफेरी काढण्यात येत असते.

एवढेच नाही तर योग पतंजली समिती मूल च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच नुकतेच१२/०८ते१७/०८पर्यंत एक्यउप्रएशर,सुजोक,वाईब्रेशन,नेचुरल थेरपी चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांत मूलमधिल २५०वर लोकांनी यांचा लाभ घेतला आहे. यांत विना औषधाने विविध रोगांवर उपचार करण्यात आले आहेत.

योग पतंजली समिती मूल च्या वतीने मूलमधिल नवगठीत प्रेस क्लब मूल च्या पदाधिकारी व सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि योग पतंजली समिती मूल च्या कार्याची व्याप्ती जनतेसमोर ठेवण्यासाठी एका पत्रपरिषदेचे आयोजन केले होते.आणि यानंतरही सहकार्याची हमी दिली आहे , तसेच सगळ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विनंती केली आहे ,या पत्रकार परिषदेत पतंजली योग समिती मूलचे अध्यक्ष, प्रभाकर भोयर, उपाध्यक्ष अनिल गांगरेड्डीवार, सचिव दिलीप पोकडे आणि मूलच्या माजी नगराध्यक्षा सौ रत्नमाला भोयर,किशोर भडके,रवी कोट्टलवार आदी उपस्थित होते.आपण समाजात वावरताना बऱ्याचदा आर्थिक असमानता एखाद्याची इच्छा असतानाही ऐपत नाही म्हणून आपल्या पुढ्यात वाढून ठेवलेले इप्सित साध्य करता येत नाही,ही वास्तविकता असली तरीही ती बदलण्याचे कार्य व स्वप्नपूर्ती पतंजली योग समिती मूलच्या वतीने सुरु असल्याचा दावा पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रेस क्लब मूल च्या मंचावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला.आर्थिक असमानता असतांनाही, बचत गटाच्या जोरावर समाजातील निम्न स्तरातील व्यक्तीही गगनभरारी घेऊ शकते हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे असे मत योग पतंजली समिती मूल चे पदाधिकारी , अध्यक्ष प्रभाकर भोयर , उपाध्यक्ष तथा प्रशिक्षक अनिल गांगरेड्डीवार, सचिव दिलीप पोकडे,व माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर तथा सदस्य
पतंजली योग समिती मूल यांनी स्पष्ट केले.योग पतंजली समिती मूल ची स्थापना २०१२-१३या आर्थिक वर्षात करण्यात आली, आणि त्या माध्यमातून दररोज सकाळी ५ ते ७ या वेळात योगा, प्राणायाम ध्यान आणि प्रार्थना केली जाते. पुढे याच माध्यमातून लोक जोडून ठेवण्यासाठी एका बचत गटाची स्थापना करण्यात आली यांत २८१लोकांनी २००₹प्रमाणे शुल्क भरुन सदस्यत्व स्वीकारले.आणि सदस्यांमध्ये संवाद, आत्मियता आणि सलोखा वाढावा म्हणून दरमहिन्यात एकदा ६-७सदस्यांनी एकत्र येत सामुहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागला.ह्याला वाढता प्रतिसाद मिळाला आणि ह्या समितीतील सदस्यांनी मान.नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे एक विनंती अर्ज सादर करुन स्वामी रामदेव बाबा यांना मूल नगरीत आमंत्रित करून एक महाशिबीर घेण्याची इच्छा प्रकट केली.या विनंती अर्जानुसार २०१८च्या १९,२०आणि२१फेब्रुवारी रोजी मूलमध्ये कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणात एक भव्यदिव्य महाशिबीर आयोजित करून ते यशस्वी करण्यात योग पतंजली समिती मूल च्या पदाधिकारी यांना प्रचंड यश मिळाले.

त्यानंतर योगाकडे वळणाऱ्यांची संख्या एकदम वाढली ,याच दरम्यान योग पतंजली समिती मूल च्या वतीने नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे योगाभवन साठी मागणी करण्यात आली.
नगराध्यक्षा सौ रत्नमाला भोयर यांनी इतर नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या सहकार्याने मूल नगरपरिषदेच्या माध्यमातून एक ठराव घेऊन तो मंजूर केला व ही मागणी नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करण्यात यश मिळवले.८८लक्ष रुपये खर्च करून महाराष्ट्रातील एक आगळेवेगळे योगाभवन पूर्णत्वास जाऊन १८/०७/२०२१रोजी त्याचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान.नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

याच २०२१साली वात्सल्य बचत गटाची स्थापना करण्यात आली ,११०१₹प्रतिमाह याप्रमाणे सदस्य शुल्क घेऊन बचत गटाची नोंदणी करण्यात आली आणि त्या माध्यमातून बचत गटातील ११०व्यक्तींना आम्ही नागपूर वरुन विमानाने दिल्लीला व तेथून पुढे काश्मीर व वैष्णोदेवी व परत असा अकल्पित आणि कित्येकांना केवळ स्वप्नच वाटावे असा प्रवास विमानाने घडवून आणला. अशाप्रकारच्या सहलीचे आयोजन आम्ही नियमित करीत असतो , व अशक्य वाटणाऱ्यांना ते शक्य करून दाखवतो. हा आमचा विशेष उल्लेखनीय टप्पा कारण मोलकरीण व मोलमजुरी करणारे यांनाही या प्रवासाचा आनंद घेताना बघून त्यांच्या डोळ्यातील तो आनंद आमचा आनंद द्विगुणित करुन गेला.
त्यानंतर आम्ही केवळ विदेशवारी घडवून आणण्यासाठी वारी गटाची स्थापना केली व सदस्य शुल्क ठेवलेआहे,३१००₹ प्रतिमाह या माध्यमातून आम्ही ४०लोकांचा एकत्र जोडलेले आहेत आणि सर्वानुमते विदेशवारी करण्याचा मानस आहे.
मूलमध्ये आधी १०-१२ठिकाणी योग साधना केंद्र चालवले जात होते , परंतू जागेचा अभाव , पाऊसपाणी यांमुळे इतर केंद्र बंद करण्यात आले असले तरी योगाभवन मध्ये दररोज ७०-७५साधक आपली उपस्थिती दर्शवितात त्यापैकी किमान ५० साधक नियमित उपस्थित असतातच असेही याप्रसंगी मान्यवरांनी स्पष्ट केले. तसेच २१जून रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नगरात प्रभातफेरी काढण्यात येत असते.

एवढेच नाही तर योग पतंजली समिती मूल च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच नुकतेच१२/०८ते१७/०८पर्यंत एक्यउप्रएशर,सुजोक,वाईब्रेशन,नेचुरल थेरपी चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांत मूलमधिल २५०वर लोकांनी यांचा लाभ घेतला आहे. यांत विना औषधाने विविध रोगांवर उपचार करण्यात आले आहेत.

योग पतंजली समिती मूल च्या वतीने मूलमधिल नवगठीत प्रेस क्लब मूल च्या पदाधिकारी व सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि योग पतंजली समिती मूल च्या कार्याची व्याप्ती जनतेसमोर ठेवण्यासाठी एका पत्रपरिषदेचे आयोजन केले होते.आणि यानंतरही सहकार्याची हमी दिली आहे , तसेच सगळ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विनंती केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]