किशोरदादा टोंगे यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी...शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन...

वरोरा....जगदीश पेदाम

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिके असून शनिवारला झालेल्या मुसळधार पावसामुळे शेगाव,चारगाव तसेच परिसरात शेतकऱ्यांचे कपास ,तूर,सोयाबीन पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याची माहिती मिळताच समाजसेवक किशोर दादा टोंगे यांनी पूरस्थिती घटनास्थळाला भेट देत शेतकऱ्यांची पिकांची पाहणी करत नुकसान भरपाई देण्याची आश्वासन दिले आहे..
 शेगाव, चारगाव, अर्जुनी, धानोली, दादापूर, मानोरा, कोकेवाडा, किनाळा, आष्टा,  परिसरातील  सर्व नदी नाले अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे ओवर फ्लो वाहू लागले व चारगाव मध्यम प्रकल्प  धरणाला महापूर आल्याने पुराच्या पाण्याने महारुद्र रूप प्राप्त करून सर्वत्र पाण्याचे अच्छादन पसरले असून शेत पिकांचे नुकसान झाले या महाभयानक पुराणे परिसरातील शेतकऱ्यांचे डोळ्यासमोर असलेले पिके वाहून गेले असुन शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या  कळताच  सामाजिक कार्यकर्ते लोकप्रिय  किशोर दादा टोंगे यांनी प्रत्यक्ष  पीडित शेतकरी बांधवांची भेट घेऊन त्यांना धीर देत त्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले, पीडित शेतकरी समोर वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून सर्व माहिती दिली व या सर्व परिसरातील सर्व शेतीची पाहणी करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली.  तालुक्यातील नदी लगत असलेल्या सर्व शेतामध्ये पुराचे पाणी साचले असल्याने येथील सर्व शेती पिके नष्ट होण्याच्या मार्गात लागली आहे तेव्हा हाती आलेले पीक पूर्णतः नष्ट होत असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू चे पूर वाहात आहे. आधीच येथील शेतकरी हा कर्ज बाजारी होऊन शेती पिके घेत असतो परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागुल समोरील जीवन जगणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले  तेव्हा शेतकऱ्याना तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते किशोर दादा टोंगे यांनी केली असून या शेतकऱ्यांच्या सदैव मी पाठीशी राहिली अशी ग्वाही देत शेतकऱ्यांचे सांत्वन केले यावेळी अक्षय बोंदगुलवार, मधुकर भलमे, मनोज तुरानकर , छगन आडकिने , व अन्य शेतकरी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]