स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावे - जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोशिएशनची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावे - जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोशिएशनची मागणी
सावली प्रतिनिधी -  जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोशिएशन च्या वतीने "स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावे" या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठविण्यात आले.
    राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येऊन दीड वर्षाचा काळ लोटला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार तेव्हापासून प्रशासकाकडे आहे. पदाधिकारी नसल्यामुळे जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहचत नाही, शासनाने 15 वा वित्त आयोगाचा निधी देणे बंद केलेला आहे परिणामी गावातील विकास कामे ठप्प पडलेली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी हे जनतेच्या नेहमी संपर्कात असतात. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी बांधकाम सभापती संतोषभाऊ तंगडपलीवार यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे तहसीलदार सावली यांचे मार्फत पाठविण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, माजी जि. प. सदस्या मनीषा चिमूरकर, माजी जि.प.सदस्या योगिता डबले, माजी पं. स. उपसभापती रवींद्र बोलीवार्, माजी पं.स. उपसभापती तुकाराम ठीकरे. माजी पं.स.उपसभापती राजेंद्र भोयर, व्यहाड बुज सरपंच कविता बोलीवार्, मोतीराम चिमूरकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]