जि.प.गंगासागर हेटी येथे शालेय मंत्रिमंडळची निवडणूक
            नागभीड तालुक्यातील जि. प.उ.प्राथ.शाळा गंगासागर हेटी येथे वर्ग 1 ते 7 पर्यंतचे वर्ग असून 4 शिक्षक व 1 शिक्षिका कार्यरत आहेत. शाळेत वर्षभर विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊन त्याद्वारे विद्यार्थ्यात सर्वांगीन विकास घडविण्याचा प्रयत्न केला जातो. 
     राज्याचे मंत्रिमंडळ जसे लोकशाही पद्धतीने निवडून येऊन  राज्याचे कारभार पार पाडते तसे शाळेचे कारभार पार पाडताना कोण कोणती जबाबदारी पार पाडेल यासाठी दिनांक 2 ऑगस्ट,2023 रोजी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. या निवडणुकीत एकूण 25 विद्यार्थांचे जम्बो मंत्रिमंडळ बनविण्यात आले. त्यात शाळेतील एक उत्कृष्ट, हुशार आणी उत्साही विद्यार्थी असलेल्या शंतनू बनसोड याची राज्यपाल पदी निवड शाळेतील मुख्याध्यापक आणी शिक्षकांनी एकमताने केली. निवडणुकीत सर्वाधिक मते घेणाऱ्या सुहाना कामडी हिला मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. उपमुख्यमंत्री पदी आदर्श गायकवाड व ताशी बारसागडे, अर्थमंत्री म्हणून वेदांत वरठी, शिक्षणमंत्री रितिक हटवार व गुंजन वाघाडे, क्रिडामंत्री करण आत्राम व स्नेहा मडावी, स्वच्छता मंत्री तुषार कामडी व गौरी बोरकर, अन्नमंत्री डिम्पल कामडी व भौतिक म्हस्के, सांस्कृतिक मंत्री लक्ष्मी कामडी व पुष्कर बोरकर, आरोग्यमंत्री ओजस कामडी व गुंजन बोरकर, पर्यावरण मंत्री अर्णव मेश्राम व ज्ञानेश्वरी सोनवाने, संरक्षणमंत्री तन्मय खोब्रागडे व सोनाली म्हस्के यांची निवड करण्यात आली.
     निवडणूक प्रक्रिया अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पाडण्यात आली. निवडून आलेल्या सगळ्या विध्यार्थी मंत्र्यांचा शपतविधी घेण्यात येऊन सगळ्यांचे अभिनंदन करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक श्री.चनफने सर यांच्या निरीक्षणात  शाळेतील सहायक शिक्षक श्री.घावळे सर, श्री. जिभकाटे सर, सौ.वैद्य मॅडम आणी श्री.अनरसकर सर यांच्या सहकाराने पार पाडण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]