जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले----- प्रा. रत्नमाला भोयरमाजी स्वातंत्रय सैनिक व भरारी महिला संघटना मूल यांचे वतीने माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या जागेवर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रा. रत्नमाला भोयर माजी नगराध्यक्ष मूल यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . स्वातंत्र्यासाठी प्राणाप्रण केलेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली तसेच स्मृती जागृत राहण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. सैनिक देशाचे गौरवस्थानी असून त्यांचा नेहमी आदर करावा . नवयुवकांसाठी त्यांचे जिवन प्रेरणादायी आहे,युवकांनी त्यांचा आदर्श बाळगावा. त्यांच्या बलिदानामुळेच देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. आज त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. असे सांगत प्रा. रत्नमाला भोयर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. माजी सैनिक मारोती कोकाटे, सहदेव रामटेके, बाबा सुर यांचेसह  अनेक माजी सैनिक व भरारी महिला संघटनेच्या अध्यक्ष अंजली सूर, जाजमवारताई, मोहूर्ले ताई, निकूरेताई सह अनेक महिला व माजी सैनिक उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]