हर घर शिक्षा उपक्रमांतर्गत गणवेष वाटप       येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थांना जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगावतर्फे शालेय गणवेष, टाय व बेल्टचे वाटप नुकतेच करण्यात आले.
          पालकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थांना शालेय गणवेषापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे बरेचदा विद्यार्थी शालेय प्रवाहापासून दूर जातात. या बाबीचे  गांभीर्य लक्षात घेऊन जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगावतर्फे 'हर घर शिक्षा' उपक्रमांतर्गत सरस्वती विद्यालयात शिकत असलेल्या इयत्ता ५ ते १० च्या सर्व १५४ विद्यार्थ्यांना शालेय गणवेष, टाय व बेल्टचे वाटप करण्यात आले.
       याप्रसंगी संस्थासचिव मनीषाताई बारापात्रे, इंजि. संकेत बारापात्रे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]