शास. औ. प्र. संस्थेत मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्नसैनिक म्हणून माझेकडून घडलेली देशसेवा यामुळे माझे जीवन सार्थकी लागले -
  माजी  सैनिक मनोज ठेंगणे
चंद्रपूर( प्रतिनिधी)- 
   केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय द्वारा सूचित मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले होते. ९ ऑगष्ट या  क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  कौशल्यम सभागृहात मार्गदर्शन आणि पंचप्राण शपथ घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांचे मार्गदर्शनात  संस्थेच्या परिसरात प्रथमतः  अतिथीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आणि त्यानंतर भारतीय सेनेतून सेवानिवृत्त  सैनिक मनोज ठेंगणे यांच्या उपस्थितीत भूमातेस नमन व वीरांना वंदन करण्यात आले.
    याप्रसंगी मनोज ठेंगणे यांनी भारतीय सेनेतील आपले अनुभव सर्वांना ऐकवले आणि सैनिक म्हणून देश सेवा करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आणि माझे जीवन धन्य झाले असे उद्गार काढून आपण साऱ्यांनी सुद्धा राष्ट्रसेवेसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले. त्यांनी ऑगस्ट क्रांती , भारतीय  स्वातंत्र्यलढा आणि चिमूरची क्रांती यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.
     उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना गटनिदेशक जितेंद्र टोंगे यांनी पंचप्रण शपथ दिली. याप्रसंगी गटनिदेशक प्रविण बोकडे, सौ. सुचिता झाडे, सौ. सुनिता गभणे, महेश नाडमवार आदी विचारपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय घटे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश रोडे यांनी केले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी वृंद तसेच रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]