धनगर समाजातून बोगस झाडे कुणबीना हटविणार - आमदार पडळकर धनगर समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळ्यात दिले आश्वासन

धनगर समाजातून बोगस झाडे कुणबीना हटविणार - आमदार पडळकर
 धनगर समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळ्यात दिले आश्वासन
चंद्रपूर : चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात धनगर समाजात झाडें कुणबी हे घुसखोरी करीत असल्याने त्यांना हटवून धनगर समाजाला न्याय देणार असल्याचे आश्वासन चंद्रपूर येथे पार पडलेल्या धनगर समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळ्यात दिले.

 चंद्रपूर येथील धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८व्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर, चंद्रपूर धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मगेश गुलवाडे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, सिनेट सदस्य वामन तुर्के, डॉ. तुषार मार्लावार, विलास शेरकी, साईनाथ बुच्चे, लक्ष्मीताई दरेकर, महेश देवकाते, सुनीताताई येग्गेवार, विजय कोरेवार, लक्ष्मीताई बालुगवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
   आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र शासन धनगरांच्या पाठीशी असून कोणतीही मागणी, आंदोलन नसताना अहमदनगर चे नाव अहिल्यानगर केले, अहिल्याबाई होळकर स्मृती सभागृह करिता चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक कोटी किंमतीचे सहा सभागृह मंजूर केले. त्याच धर्तीवर शहरातसुद्धा हे सभागृह मंजूर करावे अशी मागणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात झाडें कुणबी हे बोगसपणे धनगर समाजाची जात प्रमाणपत्र मिळवून घुसखोरी करीत असल्याने अधिवेशनात ही मागणी लावून धरीत विशेष तपास पथक नेमायला लावली असून त्यांना हटविल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका मांडली. 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धनगर समाजाला 3-4 महिन्यात घरकुल देणार असल्याचे आश्वासन दिले व इतरही मागण्या पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.
समाजाचे कार्यकर्ते डॉ. तुषार मर्लावार यांनी मेंढपाळ समाजाची समस्या मांडत झाडें जातीची घुसखोरी, मेंढया चराई प्रश्न, इत्यादी अडचणी लक्षात आणून दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनगर जमात मंडळाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. संचालन प्रवीण गिलबिले तर आभार अंबर खानेकर यांनी मानले.
आमदार गोपीचंद पडळकर यांचेसोबत चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांवर धनगर कार्यकर्ते चर्चा करतांना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]