सिंधपुरी येथे बस थांबा निवेदनाची आगार प्रमुखाणे घेतली दखल

जनतेनी मानले आभार

बस थांबा सुरू 

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - सिंधपुरी या गावामध्ये बस थांबण्याची निवेदन सरपंच विजु मानापुरे तसेच गावातील समस्त नागरिक यांनी निवेदनामार्फत मागणी केली होती या मागणीची दखल घेत आगार प्रमुखाणे बस थांबविण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे गावकरी नागरिक तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी च्या मनात आनंद निर्माण झालं आहे. कारण त्यांना शाळेमध्ये किंवा इतर कोणत्याही मार्गावर जाण्यासाठी या बस थांबा मुळे अडचण येणार नाही व सहजरीत्या सिंधपूरी येथील स्थानिक नागरिक किंवा वयोवृद्ध जनतेला पवनी भंडारा येथे जाण्याची समस्या दूर झालेली आहे. सिंधपूरी हे गाव पर्यटन स्थळ आहे.देश विदेशातील जनता त्याठिकाणी भव्य असे बुद्ध विहार असल्याने दर्शनासाठी जनतेची गर्दी होत असते. व हे गाव जवळपास सातशे ते आठशे लोकवस्तीचे गाव असल्यामुळे बस थांबा गरजेचे होते असे काम तेथील प्रथम नागरिक सरपंच विजु मानापुरे तसेच त्यांचे सहकारी बाळू पुंडे व शाळेतील विद्यार्थी गावकरी जनता व एस.टी महामंडळाचे पवनी चे आगार प्रमुख अधिकारी याठिकाणी उपस्थित होते व त्या ठिकाणी बोर्ड लावून बस थांबा देण्यात आला.याबाबत जनतेनी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]