एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे आंतरराष्ट्रीय उद्यमिता दिवस संपन्न
फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर च्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीड़ा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय उद्यमिता दिवसाचे आयोजन करण्यात आले

विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ कल्पना कावळे, मार्गदर्शक कु प्रेमिला चकोर, प्रा डॉ मेघमाला मेश्राम, प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,प्रा अशोक बनसोड,प्रा डॉ आनंद वानखेडे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ कल्पना कावळे यांनी स्वंयरोजगाराचे महत्व सांगून त्यासाठी उपलब्ध पया॔याची माहिती दिली
प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु प्रेमिला चकोर - हांडे यानी स्वतःचे व्यवसायिक अनुभव कथन करुण स्वंयरोजगाराचे वर्तमानकाळात असलेले महत्व विशद केले

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व प्रास्ताविक शैक्षणिक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांनी केले तर आभार प्रा अशोक बनसोड यांनी मानले 

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली

सदर कार्यक्रमाला प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनीची मोठया संख्येने उपस्थिती होती
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता बंडु वरवाडे, वामन तपासे, रमेश गुरनुले, नथ्थु कामडी,सुशिल पुप्पलवार यांचे मोलाचे सहकाय॔ लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]