शेतकरी पुत्राची आय आय टी दिल्लीला गवसणी


मूल:----तालुक्यातील छोटयाशा बोरचांदलीसारख्या  खेड्यातील विद्यार्थी जयदिप महेश कटकमवार यानी स्वतः मधील जिद्द आणि मेहनत
कायम ठेवून "जे.ई. ई अडवान्स २०२३" ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली व भारतातील सर्वोच्च संस्था भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, दिल्ली (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली) येथे प्रवेश मिळवला. काहीतरी वेगळे करण्याची जिदद,  साहस उराशी बाळगून अभ्यासातील सातत्य व ऑनलाईन शिक्षणाचा वापर करून त्यांने हे यश प्राप्त केले आहे.
जयदीप हा बोरचांदली येथील प्रगतिशील शेतकरी महेश कटकमवार ह्यांचा मुलगा आहे.
योगेश कटकमवार ह्यांचा मानसपुत्र आहे.ज्यांनी जयदिप ला सुरवातीपासूनच ध्येय गाठण्यासाठी सतत प्रोत्सहित केले आहे.
सेंट ऐंट्स हायस्कूल मूल मधून एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नागपूर येथील  कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेतला  ते केवळ दोन महिनेच. परंतु त्याच मन स्वस्थ बसू देईना म्हणून
त्यांनी ऑनलाईन प्रणालीचा आधार घेतला आणि जे.ई. ई मेन २०२३ परीक्षेत ९९.९० गुणासह विदर्भ टॉपर यादीत झळकला . आल इंडिया रँक ११५ सह आणि त्याच्या स्वप्नाचे चिज झाले. आणि अब दिल्ली दूर नही असे म्हणत आय आय टी दिल्ली प्रवेश करण्याचं ठाम निश्चय केला आणि आपल्या मनातील आय आय टी ची निवड केली..!!

सध्या आय आय टी दिल्ली येथील अरावली हॉस्टेल मध्ये राहून प्रत्यक्ष वर्ग कार्यात मग्न झाला आहे

त्याच्या भविष्यातील संपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षाव व
अभिनंदन होत आहे.
जयदिप ने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील,का का योगेश कटकमवार यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]