वरोरा येथील सहाय्यक पोलीसाचा दारूच्या नशेत साई ट्रॅव्हल्स मध्ये धिंगाणा

चिमूर पोलीस स्टेशनची कारवाई

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर येथील साई ट्रॅव्हल्स MH 34 AB 8251 हि सकाळी ८ वाजून १५ मनिटांनी चंद्रपूर येथे नियमितपणे प्रवासी घेऊन निघाली व वरोरा येथे ९ वाजून ४५ मिनिटांनी पोहचली वरोरा येथील रत्नमाला चौकातून वरोरा पोलीस स्टेशनचे दिलिप बाबुराव मेश्राम सहाय्यक फौजदार हे दारूच्या नशेत असतांनाच साई ट्रॅव्हल्स मध्ये चंद्रपूर ला जाण्यासाठी बसले पोलीस असल्याने ट्रॅव्हल्स वाल्यांनी ट्रॅव्हल्स मध्ये बसु दिले आणि १० वाजून ४५ मिनीटांनी  चंद्रपूर चे स्टॉप आल्यानंतर सुद्धा ट्रॅव्हल्स मधून मधधुंद अवस्थेत असलेला सहाय्यक फौजदार यांना ट्रॅव्हल्स वाल्यांनी चंद्रपूर चा स्टॉप आला असे सांगितले असता पोलीस बस च्या खाली उतरायला तयार नाही अशाही अवस्थेत ट्रॅव्हल्स ११ वाजता चंद्रपूर वरून चिमूर ला परत प्रवासी घेऊन निघाली परंतु मधधुंद अवस्थेत असलेल्या फौजदारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
व चंद्रपूर वरून चिमूर येथे १ वाजून ३० मिनिटांनी ट्रॅव्हल्स त्यांच्या स्टॉप वर पोहचली तेव्हा साई ट्रॅव्हल्स च्या मालकांनी स्वतः खाकी वर्दीवर असलेल्या सहाय्यक फौजदार यांना ई - रिक्षात बसवून चिमूर पोलीस स्टेशन ला नेले व पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांना संपूर्ण आपबीती सांगितली त्यांनंतर चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सहाय्यक फौजदार यांना मेडिकल करीता नेले याची वरोरा तसेच चिमूर शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून युनिफॉर्म (खाकी वर्दी ) घालून त्याचे अपमान केले यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रवाशांकडून मागणी करण्यात आली. जेणेकरून रक्षकच अशाप्रकारे नियमाचे उल्लंघन करतील तर न्याय मागावे तरी कुणाकडे असा ? निर्माण जनतेला पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]