आरोग्य विभागाचे लसिकरण वहनाला धडक: तिनं जखमी

तळोधी (बा.) नागभिड-तळोधी या राज्य महामार्गावरील जनकापूर फाट्याजवळ आज दुपारी १२.३० वाजता चे दरम्यान तळोधी वरून ब्रम्हपूरी कडे जाणारे वाहन क्रमांक एम.एच.३१-आर.७३१६ व भंडारा वरुन चंद्रपूर कडे जाणारे वाहन क्रमांक एम.एच.३६-एफ.३६९३ या दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने एक गंभिर जखमी असुन अन्य दोन जखमी झाले आहेत.


  आज १२ वाजताचे दरम्यान तळोधी येथे महात्मा फुले विद्यालय जवळ दुचाकी वाहक रमेश किसन श्रिरामे रा. चिचखेडा यांचा अपघात झाला.त्याला तळोधी प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानत़ंर ब्रम्हपूरी येथे पुढील उपचारासाठी एका नातेवाहिकासोबत लसिकरण वाहानाने नेत असतांनाच जनकापुर जवळ नागभिड कडुन विद्युत विभागांचे सामान घेवुन जाणाऱ्या वहनासोबत जोरदार धडक झाल्याने लसिकरण वाहनातील पेशंट ला पुन्हा जोरदार दुखापत झाली तर त्याचेसोबत असलेल्या श्रिरामे व  ट्रक ड्रायव्हर जखमी झाले. नागभिड पोलीसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले व लगेच जखमींना  पोलीस वाहनात उपचारासाठी नागभिड येथे नेण्यात आले.अधिक तपास नागभिड पोलीस करित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]