मूलच्या युवकांचा दिल्लीत डंका ! गाठली मनासारखी आयआयटी !!

मूलच्या युवकांचा दिल्लीत डंका !

गाठली मनासारखी आयआयटी !!प्रयत्नाला जिद्दीची जोड असली कि, यश मिळतेच, अशावेळी परिस्थितीलाही माघार घ्यावी लागते, याचे उदाहरण मूल तालुक्यातील जयदिप महेश कटकमवार! mahesh katkatmwar IIT Delhi

जयदिप कटकमवार यांनी जेईईच्या कठीण परिक्षेत लक्षणीय यश मिळवित, दिल्ली येथील आयआयटीत प्रवेश मिळविल्यांने, त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. JEE

जयदीपने ऑनलाईन प्रणालीचा आधार घेतला आणि जे ई ई मेन २०२३ परीक्षेत ९९.९० पर्सेंटाइल घेत विदर्भ टॉपर यादीत झळकला. त्याला आॅल इंडिया रँक ११५ मिळाली आहे.

जयदिप हा मूल तालुक्यातील बोरचांदली येथील प्रगतशील शेतकरी, महेश कटकवार यांचा मुलगा, प्रा. योगेश कटकमवार यांचा पुतण्या असून, त्यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण मूल तालुक्यातच झाले. आयुष्यात काही वेगळे करण्यांचा मानस असलेला जयदीपने आपली करीअर करीता जेईईची निवड करून अभियंता होण्यांचा मार्ग स्विकारला. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले, आयआयटी तिरूपतीमध्ये प्रवेशास तो पात्रही ठरला, मात्र मिळालेले हे यश आपली स्वप्नपूर्ती करू शकणार नाही, याची खात्री वाटल्यांने, त्यांनी पुन्हा जेईईची परिक्षा देत यश मिळविले व देशातील टॉप 5 मधील आयआयटीत शिकण्यांचे स्वप्न पूर्ण करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी जेईईची तयारी, बोर चांदली येथील घरी राहूनच आॅनलाईनच्या माध्यमातून परिक्षेची तयारी करीत हे यश मिळविले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]