काय आहे रक्षाबंधनाचा इतिहास? Rakshabandhan

काय आहे रक्षाबंधनाचा इतिहास
#Rakshabandhan


History of Rakshabandhan

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे.

महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले. भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती. नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्‍यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.

पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.


बळी नावाचा राजा अश्र्वमेध यज्ञ करत होता. त्याक्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळी राजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णून वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे ठाकले. त्यांनी बळी राजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली. बळी राजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रुपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली. दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळी राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले.

बळी राजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की, मला असा आशीर्वाद घ्या की, इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला. आणि बळी राजासोबत पाताळात राहणे पसंत केले.


देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले.त्यांना चिंता वाटू लागली . त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली. त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला.विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला, त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. बळी राजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले? त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळी राजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले.त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठविण्याची मागणी केली. त्या दिवसापासून बहीण- भावाचे नाते जपणारा असा हा सण केला जातो.

राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत.

भाद्र काळात राखी का बांधली जात नाही
धार्मिक मान्यतांनुसार, भाद्र काल हा एक अशुभ काळ मानला जातो ज्यामध्ये लोक शुभ समारंभ आणि क्रियाकलाप करण्यापासून दूर राहतात . भद्रा कालच्या आख्यायिका सांगतात की भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि सूर्यदेवाची कन्या होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]